बहिरेवाडी येथे आगीत दोन लाखांचे नुकसान

By Admin | Updated: May 24, 2014 01:00 IST2014-05-24T00:48:34+5:302014-05-24T01:00:04+5:30

सुदैवाने जीवितहानी टळली : गॅस सिलिंडरच्या स्फोटाने परिसर हादरला

The loss of two lakhs in the fire at Deoriwadi | बहिरेवाडी येथे आगीत दोन लाखांचे नुकसान

बहिरेवाडी येथे आगीत दोन लाखांचे नुकसान

 उत्तूर : बहिरेवाडी (ता. आजरा) येथील जुन्या ग्रामपंचायतीजवळ असणार्‍या शिवानंद आपय्या गडकरी व बाबूराव कृष्णा कोपटकर यांच्या मालकीच्या दोन हॉटेल्स्ना अचानक लागलेल्या आगीत ही दोन्ही हॉटेल्स जळूून खाक झाली. ही आग आज, शुक्रवारी पावणे एकच्या सुमारास लागली. यामध्ये सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. यावेळी कोपटकर यांच्या दुकानातील सिलिंडरने पेट घेतल्याने मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसर हादरला. अधिक माहिती अशी, उत्तूर-बहिरेवाडी-निपाणी या मार्गावर गावात ही दोन हॉटेल्स आहेत. आज, शुक्रवारी एकच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट इतका मोठा होता की, परिसरात झोपी गेलेले आवाजाच्या दिशेन हॉटेलजवळ जमा झाले. एवढ्यात आगीने रौद्ररूप धारण केले होते. यावेळी ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. संकेश्वर (ता. हुक्केरी) येथील नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाडीला बोलावून घेऊन आग आटोक्यात आणण्यात आली. अन्यथा, शेजारी असणारी जुनी ग्रामपंचायत इमारत जळून खाक झाली असती. मंडल अधिकारी प्रकाश जाधव, तलाठी एस. वाय. कांबळे, सरपंच अर्जुन कुंभार, सुरेश खोत, आदींनी पंचनामा केला. (वार्ताहर)

Web Title: The loss of two lakhs in the fire at Deoriwadi