शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

लिपिकास मारहाण? महापालिकेचे कामकाज ठप्प

By admin | Updated: September 2, 2015 00:05 IST

तणावाचे वातावरण : अतिक्रमण कारवाईस फरास यांचा विरोध; आदेश पाळण्यावरुन कर्मचाऱ्यांची गोची

कोल्हापूर : अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या लिपिकाला मारहाण केल्याच्या अफवेने महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी काही काळ कामकाज बंद ठेवले. यावेळी महापालिकेच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे चौकात सर्व कर्मचारी एकत्र आल्याने तणावाचे वातावरण होते. काही वेळाने अतिक्रमण विभागाचे लिपिक पंडितराव पोवार यांनी असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे कर्मचाऱ्यांना सांगितल्याने सर्व कर्मचारी कामावर परतले.स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी (दि. २८ आॅगस्ट) उपमहापौर ज्योत्स्ना मेढे-पवार यांनी लुगडी ओळ येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या परिसरातील नवीन अतिक्रमित केलेल्या मिळकती हटवाव्यात, असा आदेश दिला होता. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अतिक्रमण विभागाचे लिपिक पंडितराव पोवार हे सोमवारी सायंकाळी लुगडी ओळ परिसरात कर्मचाऱ्यांसह गेले. त्यावेळी परिसरातील रूपम नाष्टा सेंटर या चहा विक्रेत्या केबिनधारकास भेटले. त्याला त्यांनी दोन दिवसांत संबंधित अतिक्रमित केबिन काढून घ्यावी, अन्यथा कारवाईचा विभागामार्फत इशारा दिला. त्यामुळे त्याने नगरसेवक आदिल फरास यांना कारवाईबाबतची कल्पना दिली. त्यावेळी फरास यांनी थेट पोवार यांना मोबाईलवरून कोणीही आदेश देऊ दे, पण केबिन जाग्यावरून काढायची नाही, असे सुनावले. त्यानुसार हे अतिक्रमणचे पथक रिकाम्या हातांनी परतले. दरम्यान, पंडितराव पोवार यांना फरास यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची अफवा मंगळवारी सकाळी महापालिकेत पसरली. त्यामुळे सकाळी अकरा वाजता सर्वच कर्मचाऱ्यांनी कामच सुरू केले नाही. सुमारे सातशे कर्मचारी काम बंद ठेवून एकत्र आले. काही वेळातच पोवार हे महापालिकेत आले. पाठोपाठ फरासही आले. फरास यांनी सर्वच अतिक्रमित केबिन काढाव्यात; मगच लुगडी ओळ येथील केबिन हलवावी, असे सांगून पोवार यांना आपण मारहाण अगर शिवीगाळ केली नसल्याचा सर्वांसमोर खुलासा केला. गैरसमज दूर झाल्यानंतर सर्व कर्मचारी निघून गेले अन् कामकाज सुरू झाले. अतिक्रमण विभाग सहा वर्षे अधिकाऱ्याविनामहापालिकेतील महत्त्वाचा असा हा अतिक्रमण विभाग आहे. महापालिका निवडणूक नजीक असल्याने दोन नगरसेवकांच्या वादात अतिक्रमण विभागाला आदेश देऊन कारवाई करण्याचा सपाटा काहींनी लावला आहे; पण यामध्ये या विभागाच्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात आहे.विशेष म्हणजे, गेली सहा वर्षे या विभागाला सक्षम अधिकारी नाही. पंडितराव पोवार हे लिपिक असून हेच हा विभाग चालवीत आहेत; पण त्यांना या विभागातील निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी या विभागासाठी अधिकारी नेमावा, अशी मागणी केली आहे.