कोल्हापुरातील २६ शेती सेवा केंद्रांचा परवाना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:44 IST2021-02-21T04:44:29+5:302021-02-21T04:44:29+5:30

------------------------------- सांगलीत जुगार अड्डा उद्ध्वस्त सांगली : शहरातील कर्नाळ चौकी ते बायपास रोडवरील एका इमारतीत सुरू असलेला १३ ...

Licenses of 26 Agricultural Service Centers in Kolhapur suspended | कोल्हापुरातील २६ शेती सेवा केंद्रांचा परवाना निलंबित

कोल्हापुरातील २६ शेती सेवा केंद्रांचा परवाना निलंबित

-------------------------------

सांगलीत जुगार अड्डा उद्ध्वस्त

सांगली : शहरातील कर्नाळ चौकी ते बायपास रोडवरील एका इमारतीत सुरू असलेला १३ पानी जुगारअड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत २१ जणांना ताब्यात घेत रोख रकमेसह जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एक लाख ३२ हजार २५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

--------------------------

थकबाकीदारांचा पाणीपुरवठा अखेर खंडित

पाचगणी (जि.सातारा) : भोगवली (ता. जावळी) ग्रामपंचायतीने वर्षभर ग्रामपंचायत कर व पाणीपट्टी थकबाकी न भरणाऱ्या आठ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन खंडित केले, तर ११ थकबाकीदारांनी भीतीपोटी थकबाकी भरल्याने दोन तासांत २६ हजारांचा कर वसूल झाला आहे.

-----------------------

विशेष निराधारांचे अनुदान खेाळंबले

रत्नागिरी : निराधार व्यक्तींना अर्थसाहाय्य करणाऱ्या केंद्र सरकारच्या विशेष निराधार योजनांचे दोन महिन्यांचे अनुदान खोळंबले असल्याने सध्या जिल्ह्यातील १०,६२० वंचित या अनुदानाची प्रतीक्षा करीत पोस्ट कार्यालयांमध्ये हेलपाटे मारत आहेत. विशेष योजनांतर्गत निराधार घटकांसाठी संजय गांधी निराधार योजना विभागातर्फे मासिक लाभांच्या योजना राबविण्यात येतात.

--------------------------

अवैध दारू वाहतूक करताना दोघे ताब्यात

वेंगुर्ला (जि.सिंधुदुर्ग): बेकायदेशीर गोवा बनावटीचा दारूचा व्यवसाय व त्याची वाहतूक करणाऱ्या दोघांवर वेंगुर्ला पोलिसांंनी कारवाई करीत ताब्यात घेतले. सिद्धेश सीताराम राणे (रा. रेडी-हुडावाडी) व चिंतामणी वामन म्हापणकर, अशी दोघांनी नावे आहेत. या दोघांकडून गोवा बनावटीची दारू, तसेच इतर साहित्यासह सुमारे ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: Licenses of 26 Agricultural Service Centers in Kolhapur suspended