शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

लायसेन्स होणार नाही रद्द; ३० तारखेपर्यंत सर्वच कामे होणार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : मुदत संपलेल्या लर्निंग लायसेन्स, फिटनेस प्रमाणपत्र, पासिंग यांसह अन्य कामांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : मुदत संपलेल्या लर्निंग लायसेन्स, फिटनेस प्रमाणपत्र, पासिंग यांसह अन्य कामांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे; मात्र कोटा फुल्ल झाला असला तरी कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने लायसेन्सचा कोटा वाढविला आहे. त्यामुळे लायसेन्स बाद होण्याची शक्यता कमी आहे. या कालावधीत वाहनधारकांनी अशा मुदत संपलेल्या कामाकरिता त्वरित ऑनलाइन अपाॅइंटमेंट घेणे गरजेचे आहे.

नवोदित वाहनधारकांनी लर्निंग लायसेन्सकरिता ऑनलाइन अपाॅइंटमेट घेतली आहे; मात्र कोरोनाच्या सलग दोन लाटांमुळे हा विभाग काही काळ बंद होता. त्यामुळे ज्यांनी अपाॅइंटमेंट घेतली होती, त्यांना ती पुढे वाढवून मिळाली. या काळात कोटा फुल्ल झाला. त्यामुळे ज्यांना ही अपाॅइंटमेंट मिळाली नाही, त्यांना लायसेन्स बाद होईल की काय, अशी चिंता लागली. या काळात अवजड व मालवाहतुकीच्या वाहनांचे पासिंग, फिटनेस प्रमाणपत्रही रखडले होते. कोरोनामुळे परिवहन कार्यालयातही काही कामांबाबत निर्बंध होते. वाहनधारकांना थेट कार्यालयात प्रवेश नव्हता. जी ऑनलाइन व घरातून मोबाइलवरून कामे असतील, ती करता येत होती. अशा सर्व कामांकरिता ३० सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली होती.

अडचणी काय आहेत?

अनेक जणांना ऑनलाइन अपाॅइंटमेंट घेताना अडचणी येत आहेत. कोटा फुल्ल झाल्यामुळे लर्निंग लायसेन्ससाठी स्लाॅट मिळत नाही. याशिवाय पासिंगसाठीही तारखेचा स्लाॅट मिळेनासा झाला आहे. अशा काही अंशी तक्रारी आहेत.

रोजचा कोटा वाढविला

रोज लर्निंग लायसेन्ससाठी १२० ते १२५ इतका नियमित आहे. ३० सप्टेंबरची मुदतवाढ मिळाल्यामुळे या काळात परिवहन कार्यालयाने वाहनधारकांची गैरसोय व लायसेन्स बाद होऊ नयेत, याकरिता दिवसाकाठी ३०० च्या वर केला आहे. त्यामुळे लर्निंग लायसेन्स काढणाऱ्यांची सोय होत आहे. गरज ओळखून ही मुदतही वाढण्याची शक्यता आहे.

लायसेन्स नव्याने काढावे लागणार की काय?

माझे लायसेन्सची मुदत संपली होती. मला कोटा संपल्यामुळे ऑनलाइन अपाॅइंटमेंट मिळत नव्हती; मात्र कोटा वाढविल्यामुळे मला अपाॅइंटमेंट मिळाली. मुदतवाढ आणि कोटा वाढविला नसता तर माझे लायसेन्स बाद झाले असते.

- प्रभाकर भोसले, कोल्हापूर.

कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शासनाने ३० सप्टेंबरनंतरही मुदतवाढ द्यावी. जेणेकरून लर्निंग अथवा पासिंग, फिटनेस प्रमाणपत्र, आदी कामे पूर्ण होतील.

- विजय पोवार, कोल्हापूर.

कोट

शनिवारी व रविवारीही आरटीओचे कॅम्प सुरू केले आहेत. याशिवाय कोटाही ३००च्या आसपास नेला आहे. कॅम्पमध्येच दोन हजारांचा कोटा केला आहे. त्यामुळे नागरिक लायसेन्सपासून वंचित राहणार नाहीत.

रोहित काटकर,

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर.

...............