शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगार कायद्यात बदल केल्यास रस्त्यावर उतरू : जगताप

By admin | Updated: December 5, 2014 00:46 IST

राज्य सरकारकडून दुजोरा दिला जात आहे

कोल्हापूर : कंत्राटी कामगारांना दहा वर्षांत कायम करावे, अशी कायद्यात तरतूद असताना, या कायद्यामध्येच बदल करण्याचा घाट केंद्र सरकारकडून सुरू आहे. त्याला राज्य सरकारकडून दुजोरा दिला जात आहे. या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात आपण रस्त्यावर उतरणार असून, याच पद्धतीने कष्टकऱ्यांच्या बाबतीत सरकार डोळ्यांवर झापड लावून चालल्यास प्रसंगी हिंसक आंदोलन करू, असा इशारा आज, गुरुवारी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिला.जगताप म्हणाले, सध्या कामगार कायदे बदलण्याचा घाट घातला जात आहे. वाढत चाललेली कंत्राटी कामगारांची संख्या हासुद्धा एक ज्वलंत विषय झालेला आहे. वाढती महागाई आणि व्यवस्थापनाचे कामगारांना कमीत कमी पगारात राबविण्याचे धोरण त्याचबरोबर कंत्राटीकरण याविरुद्ध आंदोलन करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कंत्राटी कामगार कायम नसल्याने आम्हाला परवडत नाही, या नावाखाली कायद्याने कामगारांसाठी अभिप्रेत असणाऱ्या सुविधा व फायदे कंपन्यांकडून दिले जात नाहीत. राज्यात नव्यानेच सत्तेवर आलेल्या सरकारने कोणती तत्परता दाखविली असेल तर ती म्हणजे केंद्र सरकारने घाट घातलेल्या कंत्राटी कामगार कायद्यात बदल करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचबरोबर कॉँग्रेस सत्तेत असणाऱ्या ५८ वर्षांच्या कार्यकाळात कंपन्या बंद करण्याची परवानगी सरकारने कधीही कंपनीच्या मालकांना दिली नाही परंतु आता कामगार संख्येचे कारण पुढे करत त्या बंद करण्याची परवानगी देण्याचे षङ्यंत्र भाजप सरकारकडून रचले जात आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामध्ये राजस्थान, मध्यप्रदेश, गोवा आदी राज्यांमध्ये हे धोरण राबविले आहे. महाराष्ट्रात अद्याप हा निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसली तरी त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. त्याला कडाडून विरोध केला जाणार आहे, असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेता काँग्रेसचाच ंविधानसभेत काँग्रेसच्या आमदारांची संख्या राष्ट्रवादी कॉँग्रेसपेक्षा जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता हा आमचाच होईल, असा विश्वास काँग्रेसचे नेते आमदार भाई जगताप यांनी आज, गुरुवारी येथे व्यक्त केला. त्याचबरोबर ‘एकांडा शिलेदार’ असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या ताकदीवर ६३ आमदार निवडून आणून आपले नेतृत्व सिद्ध केले, असेही ते म्हणाले.