शिक्षक वेतन त्रुटी दूर करण्यासाठी पाठपुरावा करू - आबीटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST2021-09-22T04:27:10+5:302021-09-22T04:27:10+5:30

काेल्हापूर : सातव्या वेतन आयोगामध्ये जानेवारी २०१४ नंतर नियुक्त झालेले शिक्षक व पदवीधर शिक्षकांच्या वेतनश्रेणीमध्ये असलेली त्रुटी दूर ...

Let's follow up to eliminate teacher salary error - Abitkar | शिक्षक वेतन त्रुटी दूर करण्यासाठी पाठपुरावा करू - आबीटकर

शिक्षक वेतन त्रुटी दूर करण्यासाठी पाठपुरावा करू - आबीटकर

काेल्हापूर : सातव्या वेतन आयोगामध्ये जानेवारी २०१४ नंतर नियुक्त झालेले शिक्षक व पदवीधर शिक्षकांच्या वेतनश्रेणीमध्ये असलेली त्रुटी दूर होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन आमदार प्रकाश आबिटकर यांनी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळास दिले.

सहाव्या वेतन आयोगामध्ये प्राथमिक शिक्षकांना ५२००-२०२०० व ग्रेड पे २८०० अशी वेतनश्रेणी लागू होती. त्यानंतर १२ वर्षे पूर्ण होऊन त्यांना चट्टोपाध्याय वरिष्ठ श्रेणी मिळत होती . त्यामध्ये ९३००-३४८०० व ग्रेड वेतन ४२०० ही वेतनश्रेणी मिळत होती. बारा वर्षांच्या सेवेनंतर चट्टोपाध्याय लागू झालेवर ग्रेड पे १४०० रुपये वाढत होता. सहाव्या वेतन आयोगाचे बेसिक सातव्या आयोगामध्ये रूपांतर होताना, बेसिक गुणिले २.५७ हा फाॅर्म्युला आहे. त्यामुळे ज्या शिक्षकांची १२ वर्षे ३१ जानेवारी २०१६ ला पूर्ण झाली, त्यांचे बेसिक गुणिले २.५७ या फाॅर्म्युला वाढले.

मात्र, १ जानेवारी २०१६ किंवा तदनंतर ज्या शिक्षकांची १२ वर्षे पूर्ण झालीत त्यांचे बेसिक हे सातव्या आयोगानुसार श्रेणी १३ मध्ये गेल्याने सदर शिक्षकांचे एका दिवसासाठी वेतन खूप फरकाने मागे गेल्याचे पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

या वेळी जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील, शंकर पवार, शारदा वाडकर, सुनीता पाटील, रंगराव वाडकर, पी. आर. पाटील, दिग्विजय कोटकर उपस्थित होते.

Web Title: Let's follow up to eliminate teacher salary error - Abitkar