शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

डाव्यांचा आज मुंबईत महामोर्चा

By admin | Updated: March 11, 2015 00:31 IST

पानसरे हत्या प्रकरण : मारेकऱ्यांच्या अटकेसाठी राज्यातील ६० हजार कार्यकर्ते रवाना

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी करण्यासाठी सर्व डाव्या पक्षांतर्फे आज, बुधवारी मुंबईत मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील डाव्या पक्षांचे आणि पुरोगामी चळवळीतील सुमारे पाच हजार कार्यकर्ते मंगळवारी मुंबईला रवाना झाले आहेत. या मोर्चात महाराष्ट्रातील सुमारे साठ हजार कार्यकर्ते सहभाग घेणार आहेत. भायखळा येथील राणीच्या बागेपासून सकाळी अकरा वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. दुपारी दीड वाजता हा मोर्चा सीएसटी परिसरातील आझाद मैदान येथे पोहोचणार आहे. या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या सभेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव भालचंद्र कांगो, माकपचे सचिव अशोक ढवळे, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, प्रताप होगाडे यांच्यासह डाव्या आणि पुरोगामी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भाषणे होतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना पानसरेंच्या मारेकऱ्यांच्या अटकेच्या मागणीचे निवेदन देण्यात येईल. या मोर्चात महाराष्ट्रभरातील सर्व डाव्या व पुरोगामी पक्षांचे सुमारे साठ हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. कार्यकर्त्यांसाठी आझाद मैदान येथे दोन हजार चौरस फूट आवारात मंडप तयार केला आहे. इथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत पानसरेंच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करा, नाहीतर राजीनामा द्या, अशी मागणी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)कोल्हापुरातून पाच हजार कार्यकर्ते रवाना कोल्हापूर शहरातून या मोर्चासाठी पाच हजार कार्यकर्ते रवाना झाले आहेत. मंगळवारी सकाळी कोयना एक्स्प्रेसने सुमारे १३०० कार्यकर्ते रवाना झाले. सायंकाळी महालक्ष्मी रेल्वेने दीड हजार कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले. कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे महालक्ष्मी आणि कोयना एक्स्प्रेसचे जनरल डबे मंगळवारी फुल्ल झाले. कार्यकर्त्यांसाठी कोल्हापूर जिल्हा खासगी बस वाहतूक संघटनेतर्फे वीस ट्रॅव्हल्सची व्यवस्था करण्यात आली होती.