शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपद आरक्षण सोडत २७ नंतर शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गडचिरोली वगळता राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतदान व मतमोजणीची प्रक्रिया संपल्याने आचारसंहिता संपुष्टात आल्याचे राज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गडचिरोली वगळता राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतदान व मतमोजणीची प्रक्रिया संपल्याने आचारसंहिता संपुष्टात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. निवडून आलेल्या सदस्यांमधूनच एकाची सरपंचपदावर वर्णी लागणार असल्याने आता सगळ्यांचे डोळे सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लागले आहेत. सरपंचपद आरक्षण सोडत २७ नंतर होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी दिवसभर निवडणूक शाखेतर्फे विजयी उमेदवारांची पडताळणी करून त्यांची नावे जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होती. २३ तारखेला जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे. २४ ला सुट्टी त्यानंतर एकदिवस गेल्यानंतर लगेच २६ जानेवारीची सुट्टी आहे. त्यामुळे २७ तारखेनंतरच सरपंच आरक्षण सोडतीची तारीख जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींसाठी डिसेंबर महिन्यात आचारासंहिता लागू झाली होती. त्यामुळे आचारसंहिता लागलेल्या गावांमध्ये विकासकामे थांबली होती. या निवडणुकीसाठी १५ तारखेला मतदान व सोमवारी मतमोजणी झाल्याने आता निवडणूक प्रक्रिया संपली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता संपुष्टात आल्याची अधिकृत घोषणा केली आहे.