हळदवडे येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:26 IST2021-08-23T04:26:55+5:302021-08-23T04:26:55+5:30

विविध विकासकामांचा शुभारंभ व आरोग्य शिबिराचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी शशिकांत ...

Launch of various development works at Haldwade | हळदवडे येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

हळदवडे येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

विविध विकासकामांचा शुभारंभ व आरोग्य शिबिराचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी शशिकांत खोत होते. यावेळी कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विकास पाटील व कागल तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नीलेश शिंदे प्रमुख उपस्थिती होते. कोरोनाकाळात चांगले काम करणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला, तसेच कापशीमध्ये उत्कृष्ट कोविड सेंटर चालवल्याबद्दल शशिकांत खोत यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे स्वागत अस्मिता भराडे यांनी केले, तर प्रास्ताविक बाळासो भराडे यांनी केले. यावेळी रंगराव भराडे, ग्रा. पं. सदस्य नेताजी इंदलकर, आश्विनी इंदलकर, विजयमाला भराडे, करंजिवणेचे सरपंच दगडू शेटके, आनंदा मोरे, भिकाजी भराडे, शामराव बैलकर, रंगराव आसवले, एकनाथ पोवार, रामचंद्र भराडे, भैरु साबळे, नारायण भराडे, नामदेव आसवले, पांडुरंग भराडे या प्रमुखांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संजय भराडे यांनी मानले.

फोटो ओळ

हळदवडे (ता. कागल) येथे कापशी येथे उत्कृष्ट कोविड सेंटर चालविल्याबद्दल शशिकांत खोत यांचा सत्कार करताना भिकाजी भराडे. सोबत बाळासो भराडे, रंगराव भराडे, विकास पाटील, नीलेश शिंदे आदी.

Web Title: Launch of various development works at Haldwade