शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:17 IST

शहरवासीयांनी कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीमध्ये ओला व सुका असा वेगवेगळा कचरा द्यावा. जेणेकरून घनकचरा प्रक्रिया व्यवस्थापन अधिक सोईस्कर होईल, ...

शहरवासीयांनी कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीमध्ये ओला व सुका असा वेगवेगळा कचरा द्यावा. जेणेकरून घनकचरा प्रक्रिया व्यवस्थापन अधिक सोईस्कर होईल, असे आवाहन नगराध्यक्षा जयश्री गाट व मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार -मेढे यांनी या वेळी केले.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हुपरी नगरपरिषदेस घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत बायोमाईनिंग प्रकल्प मंजूर झाला होता. नगरपरिषद हद्दीतील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील नगरपरिषद मालकीच्या गट नंबर 1229 मध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी असणाऱ्या डंपिंग ग्राऊंडवरती हा घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा हा प्रकल्प उभारला आहे. या बायोमाईनिंग प्रकल्पातील अत्याधुनिक मशिन्सद्वारे घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यामुळे घनकचऱ्याचे रुपांतर उपयुक्त अशा खतामध्ये होणार आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ तसेच परिसरातील उद्योगांना व रहिवाशांना या प्रकल्पाचा त्रास होऊ नये यासाठी प्रकल्पाच्या सभोवती बांधण्यात यावयाच्या संरक्षक भिंतींच्या बांधकामाचा शुभारंभ या वेळी करण्यात आला. भाजप पक्ष प्रतोद रफिक मुल्ला,मनसे पक्षप्रतोद दौलतराव पाटील, नगरसेवक सुभाष कागले,गणेश वाईंगडे, नगरसेविका शीतल कांबळे,पूनम पाटील,सपना नलवडे,शशिकांत मधाळे,सचिन गाट,रवी नलवडे,राजेंद्र साळुंखे,आरोग्य अभियंता प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.

३० हुपरी प्रकल्प शुभारंभ

-

फोटो ओळी - हुपरी (ता. हातकणंगले) नगरपरिषदेच्या वतीने पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात आलेल्या अद्ययावत बायोमाईनिंग घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचा व संरक्षक भिंत बांधकामाचा शुभारंभ नगराध्यक्षा जयश्री महावीर गाट यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार-ढेरे, रफीक मुल्ला, दौलतराव पाटील, गणेश वाईंगडे, सुभाष कागले, शीतल कांबळे, पूनम पाटील आदी उपस्थित होते.