शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी बदलाचे काम अंतिम टप्प्यात

By admin | Updated: May 14, 2015 23:59 IST

साडेआठ कोटी खर्चाची योजना : जयसिंगपुरात वितरण व्यवस्था सक्षम करण्याचा पालिकेचा प्रयत्न

जयसिंगपूर : शहरवासीयांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी नगरपालिकेकडून पाठपुरावा सुरू आहे. शिवाय ‘युआयडीएसएसएमटी’ योजनेंतर्गत शहरात पाणी वितरणासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या योजनेनुसार शहराची संपूर्ण पाणी वितरण व्यवस्था तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणार आहे.दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येस व उपनगरांना पाणी व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. शासनाच्या ‘युआयडीएसएसएमटी’ या योजनेंतर्गत गेल्या पाच महिन्यांपासून शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू होते. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. राजीव गांधीनगर, प्रियदर्शनी कॉलनी, दत्त कॉलनी, समडोळे मळा, खामकर कॉलनी, दीपनगर आणि शहरात जेथे पेव्हिंग ब्लॉक बसविले आहेत, त्या भागात नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे. शिवाय शहरात अनेक ठिकाणी असणाऱ्या आणि तांत्रिक अडचण ठरणाऱ्या पाणी व्हॉल्व्हची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे एका भागाला एकाच व्हॉल्व्हमधून पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपालिकेकडून पाण्याचे योग्य नियोजन साधले जात असतानाच शहराला मुबलक पाणीपुरवठा व २४ तास पाणी मिळावे, यासाठी नव्याने साडेआठ कोटी रुपये खर्चाची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या काळात शहरवासीयांना निश्चित मुबलक पाणी मिळणार आहे. (प्रतिनिधी)