शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपीसाठी ही शेवटची मदत

By admin | Updated: November 30, 2014 00:58 IST

चंद्रकांतदादा पाटील : जमत नसेल तर साखर कारखाने बंद करा; कारखानदारांना इशारा

  कोल्हापूर : सहवीज प्रकल्प, इथेनॉल प्रकल्पातून चांगले पैसे मिळत असतानाही भ्रष्टाचार करून कारखाने संपवायचे आणि सरकारकडे मदत मागायची ही प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा साखर कारखानदारांना देतानाच ‘एफआरपी’साठी ही शेवटची मदत असल्याचे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. कारखाना चालविण्यास जमत नसेल, तर बंद करा, पण यापुढे सरकार मदत करणार नाही, असेही ते म्हणाले. कोल्हापूर जिल्हा बॅँकेत आज, शनिवारी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आजरा साखर कारखान्याचा कर्जपुरवठा बंद केल्याबाबत बैठकीत मुद्दा उपस्थित करण्यात आला. या कारखान्याचे गेल्या वर्षी २४ लाखांचे निगेटिव्ह नेटवर्थ होते, यावर्षी ते ६ कोटींपर्यंत गेल्याने कर्जपुरवठा बंद केल्याचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी सांगितले. यावर, व्यवसाय म्हणून साखर कारखाने चालविले पाहिजेत, विक्रमसिंह घाटगे, वैभव नायकवडी यांचे कारखाने नफ्यात चालतात, मग इतरांना काय झाले. सहवीज प्रकल्पातून पैसे मिळतात, मग मदतीची आवश्यकता कशाला? शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी काही हालचाली करायच्या नाहीत, भ्रष्टाचार करायचा आणि ‘एफ.आर. पी.’साठी सरकारकडे पैसे मागायचे, हे चालणार नाही. तारण मालमत्तेवर बोजा नोंद करण्यास महसूल विभाग टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी बॅँक अधिकाऱ्यांनी केल्यानंतर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना ताबडतोब पत्र देण्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले. जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर, जिल्हा विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव, उपनिबंधक डॉ. महेश कदम, शहर उपनिबंधक रंजन लाखे, अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, पुंडलिक जाधव उपस्थित होते. हवाई अंतराची अट रद्दच करणार दोन कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर टीका होऊ लागली; पण कारखाना जो चांगला चालवेल, त्याला ऊस मिळेल. स्पर्धा नको असणाऱ्यांनी बाजूला व्हावे, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी या व्यवसायात स्पर्धा येणे गरजेचे आहे. पूर्वी टेलिफोन व्यवसायात ‘बी.एस.एन.एल.’ एकटीच कंपनी होती, आता अनेक कंपन्या आल्या म्हणून त्यावर परिणाम झाला का ? असा सवालही मंत्री पाटील यांनी केला. कारखाना चालविण्यास देताना बँकांची देणी देणे बंधनकारक ‘गायकवाड’ व ‘तांबाळे’ कारखाना घेणाऱ्या ‘अथणी शुगर्स’ने जिल्हा बॅँकेची देणी भागविली नसल्याचे बॅँक अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. पैसे घ्यायचे, मग त्याची परतफेड करायला नको काय, अशी विचारणा करत बॅँकांचे पैसे दिल्याशिवाय त्यांना परवाना देऊ नये, त्याचबरोबर जुने करार झालेत त्यांनाही नोटिसा लागू करण्याचे आदेश मंत्री पाटील यांनी साखर आयुक्त शर्मा यांना दूरध्वनीवरून दिले.(प्रतिनिधी)