शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाडमध्ये युवकांनीच पेटविला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

कुरुंदवाड : येथील गोठणपूर भागात कचऱ्याचा ढीग साचूनही ठेकेदाराकडून कचरा उठाव न झाल्याने कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरली होती. ...

कुरुंदवाड : येथील गोठणपूर भागात कचऱ्याचा ढीग साचूनही ठेकेदाराकडून कचरा उठाव न झाल्याने कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरली होती. येथील नागरिकांनी पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने परिसरातील तरुणांनीच पुढाकार घेऊन कचऱ्याची विल्हेवाट लावत परिसर स्वच्छ केला.

दरम्यान, नगरपालिकेने शहर स्वच्छतेसाठी ठेकेदाराला १ कोटी ८० लाखांचा ठेका देऊनही स्वच्छतेबाबत ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांकडे लक्ष घालून ठेकेदारावर अंकुश ठेवण्याची मागणी होत आहे.

पालिकेने शहराच्या स्वच्छतेसाठी पुणे येथील भाग्यदीप एंटरप्रायजेस या कंपनीला १ कोटी ८० लाखाला ठेका देण्यात आला आहे. ठेका देताना आर्थिक वाटणीवरून चांगलेच वादळ चर्चेत आले होते. मात्र, ठेकेदाराकडून स्वच्छतेचे काम वेळेवर होत नसल्याची तक्रार नागरिकांतून वारंवार केली जात आहे.

येथील गोठणपूर पूर्व भागात मोकळी जागा आहे. या जागेत भागातील कचरा संकलन करून या ठिकाणी कचरा टाकला जातो. मात्र, वेळेवर कचरा उचलून घनकचरा व्यवस्थापन ठिकाणी न नेल्यामुळे कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नगरपालिकेकडे कचरा उचलण्यासाठी तक्रार करूनही दखल घेतली नसल्याने परिसरातील तरुणांनी एकत्र येऊन स्वच्छता करत कचरा जाळून त्याची विल्हेवाट लावली.

स्वच्छता ठेकेदाराला पावणेदोन कोटी रुपयांचा ठेका देऊनही कामात हलगर्जीपणा करीत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून लोकप्रतिनिधींनी ठेकेदारावर कारवाई करून अंकुश ठेवावा अशी मागणी होत आहे. स्वच्छता मोहिमेत सचिन गायकवाड, रोहित सनदी, रवी माने, संदीप गायकवाड, दादा सावगावे आदींनी पुढाकार घेतला होता.

फोटो - २२०४२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - कुरुंदवाड येथील गोठणपूर भागातील स्वच्छता करून तरुणांनी कचरा पेटवून दिला.