शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘बॉटनी’ने चालविली ४३ झाडांवर कुऱ्हाड

By admin | Updated: November 27, 2014 00:13 IST

पर्यावरणप्रेमींची तक्रार : महापालिका बजाविणार विद्यापीठाला नोटीस

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र (बॉटनी) विभागाच्या परिसरात ४३ झाडे तोडण्यात आली असल्याचे आज, बुधवारी समोर आले आहे. पर्यावरणप्रेमींच्या तक्रारीनंतर महानगरपलिकेच्या उद्यान निरीक्षकांनी त्यांचा पंचनामा केल्यानंतर हे स्पष्ट झाले. झाडे तोडल्याप्रकरणी महापालिका विद्यापीठाला नोटीस बजाविणार असल्याचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.वनस्पतिशास्त्र विभागाच्या परिसरात बोटॅनिकल गार्डन उभारण्यात आली आहे. या बागेच्या भागातील मोठ्या आकाराची झाडे तोडण्याचा प्रकार घडला आहे. त्याची विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यावर काही पर्यावरणप्रेमींनी महानगरपालिकेकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर आज, बुधवारी सकाळी उद्यान निरीक्षक प्रतिभा राजेघाडगे यांनी या परिसराचा पंचनामा केला. यात एकूण ४३ झाडे तोडली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये सुबाभूळची २७, गिरीपुष्पची सात आणि इतर नऊ झाडे आहेत. झाडे तोडल्याची माहिती व पर्यावरणप्रेमींकडून तक्रार झाल्यानंतर महापालिकेने या परिसराचा पंचनामा केला. त्याचा अहवाल तयार करून तो वृक्ष प्राधिकरण समितीकडे पाठविणार आहे. विद्यापीठाने संबंधित झाडे तोडण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेतलेली नसल्याची माहिती शहर अभियंता सरनोबत यांनी दिली. विद्यापीठ प्रशासनाने वनस्पतिशास्त्र विभागप्रमुखांकडून या प्रकरणाबाबत खुलासा मागविला असल्याचे सूत्रांनी सांगितले. शासनाने विद्यापीठाला बोटॅनिकल गार्डन उभारण्यासाठी निधी दिला आहे. या गार्डनसाठी प्रवेशद्वार तयार करण्यासाठी झाडे तोडली असल्याचे वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. आर. यादव यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)गांभीर्याने घेणार का ?विद्यापीठात यापूर्वी देखील भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र विभाग आणि कॅम्पस्मध्ये काही ठिकाणी बेकायदेशीरपणे झाडे तोडण्याचा प्रकार घडला आहे. त्याकडे प्रशासनाने जुजबी कारवाई करीत दुर्लक्ष केले. यावेळी तर चक्क ‘बॉटनी’मध्येच झाडे तोडण्यात आली आहेत. इतरांना वृक्षसंवर्धन, त्यांच्या पुनर्राेपणाबाबत जनजागृती करणाऱ्या विभागाकडून असा गंभीर प्रकार घडला आहे. बेकायदेशीरपणे झाडांची होणारी तोड थांबविण्यासाठी विद्यापीठ प्रशासन आता तरी जागे होऊन याबाबत गांभीर्याने काही उपाययोजना करणार का ? असा सवाल पर्यावरणप्रेमींतून केला जात आहे.