शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘कुमावत’चे बँकेत रूपांतर होईल

By admin | Updated: November 27, 2014 23:55 IST

डी. वाय. पाटील : नूतन वास्तूचे गंगावेश येथे उद्घाटन

कोल्हापूर : कुंभार समाजाने केलेली प्रगती अतुलनीय आहे. अखंडपणे ७३ वर्षे चालविलेल्या ‘कुमावत क्रेडिट सोसायटी’चे रूपांतर बँकेत होईल, असे मत बिहारचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी आज, गुरुवारी सायंकाळी व्यक्त केले. ते गंगावेश येथील कुमावत को-आॅप. के्रडिट सोसायटीच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन समारंभप्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी महापौर आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष व माजी महापौर मारुतराव कातवरे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, समाजात कर्तृत्वाने माणसे मोठी होतात. माणसाने अहंकार सोडला तर जगात सर्व काही मिळते. माणसाचे बाह्य व अंतर्मनाचे नाते हे शेतकऱ्याचे जसे जमिनीशी असते, तसे असते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शरद पवार यांनी सहकारात उत्कृष्ट काम केले आहे. १९९० ला मी राजकारणातून निवृत्त झालो, असे सांगून ते म्हणाले, बँका, पतसंस्था यांचे मोठे काम आहे; पण ते टिकवून ठेवणे आव्हान आहे. शत्रुत्व नष्ट करा, असे आवाहन डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांनी, कुंभार समाजाचे व या क्रेटिड सोसायटीचे जे प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले. प्रा. संजय मंडलिक म्हणाले, कुंभार समाजाच्या विविध अडचणी व समस्या वेळोवेळी माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी सोडविल्या आहेत. ही के्रडिट सोसायटी या समाजातील गरजूंना आर्थिक मदत करते. त्यामुळे या समाजातील व्यक्तींना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.मारुतराव कातवरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समारंभास अ‍ॅड. रामचंद्र कुंभार, बबन वडणगेकर, मनोहर पाडळकर, लक्ष्मण आरेकर, राजाराम कुंभार (आर.जी.), राजाराम मा. कुंभार (म्हारुळकर), जनार्दन कांबळे, लक्ष्मीबाई कातवरे यांच्यासह कुंभार समाजबांधव उपस्थित होते.