शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

क्षीरसागर समर्थकांकडून मोरेंंना मारहाण

By admin | Updated: October 16, 2014 01:08 IST

शनिवार पेठेतील घटना : परिसरात मोठा तणाव; निवडणुकीतील वाद

कोल्हापूर : स्वीय सहायकास मारहाण केल्याच्या रागातून आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे यांना आज, बुधवारी शनिवार पेठेतील पद्माराजे विद्यालयाच्या परिसरात मारहाण झाली. या घटनेमुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, या मारहाणीनंतर मोरे यांना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी नेले. याठिकाणी मोरे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. ही मारहाण आमदार क्षीरसागर यांच्याकडूनच झाल्याची घटनास्थळी चर्चा होती; परंतु पोलिसांत तशी नोंद झालेली नाही.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शनिवार पेठेतील पद्माराजे विद्यालयात मतदान शांततेत सुरू होते. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास पोलीस मतदान केंद्र परिसरातील कार्यकर्त्यांना बाहेर काढत होते. त्यावेळी क्षीरसागर यांचा स्वीय सहायक राहुल बंदोडे तिथे थांबले होते. इतर उमेदवारांच्या समर्थकांनीही बंदोडे यांना बाहेर काढा, अशी मागणी केली. त्यावरून मोरे व बंदोडे यांच्यात वाद झाला व त्यांना धक्काबुकी झाली. ही माहिती आमदार क्षीरसागर यांना समजताच ते कार्यकर्त्यांसह खोलखंडोबाजवळ पद्माराजे विद्यालय मतदान केंद्राकडे गेले. ही मारहाण नंदकुमार मोरे यांनी केल्याच्या संशयावरून तेथे थांबलेल्या मोरे यांना क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. हा प्रकार समजताच बंदोबस्तासाठी असलेले पोलीस तेथे गेले व जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे घटनास्थळी आले. त्यांनी सर्वांना तेथून जाण्यास सांगितले. त्यानंतर मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले. त्यामुळे नेमकी मारहाण कोणी केली, हा प्रकार नेमका कशावरून झाला, यासंबंधीची चर्चा सुरू झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस शनिवार पेठेतील पद्माराजे विद्यालयाच्या आवारात थांबून होते.