शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

के.पी. यांच्यामुळेच ‘बिद्री’ची स्थिती भक्कम

By admin | Updated: September 5, 2016 00:39 IST

हसन मुश्रीफ : मुदाळ येथे मेळावा; आगामी निवडणुकीत त्यांची आघाडी विजयी होईल

सरवडे : बिद्री साखर कारखान्यात माजी अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केलेल्या उत्कृष्ट कारभारामुळेच आजची आर्थिक स्थिती भक्कम आहे. विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्याने ते टीका करत आहेत. मात्र, आगामी निवडणुकीत के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडी १५ हजारांच्या मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. मुदाळ येथील स्वामी हुतात्मा वारके सूतगिरण येथे मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार के. पी. पाटील होते. मुश्रीफ म्हणाले, ‘बिद्री’ची प्रगती ही दहा वर्षांच्या आर्थिक कारभाराची पुंजी आहे. के. पी. पाटील यांच्या अभ्यासू व कठोर निर्णयामुळे हे शक्य झाले आहे. के.पीं.च्या नेतृत्वाखालील आघाडी सभासदांच्या विश्वासामुळे १५ हजारांच्या मताधिक्याने विजयी होईल. या विजयात महत्त्वाची भूमिका ही वाढीव होणारे व त्यामध्ये न होणारे सभासदच बजावणार आहेत. वाढीव सभासद अपात्र झाल्यानंतर विरोधक मंडळींनी साखर-पेढे वाटले. मात्र, त्यांची बाजू ऐकून कागदपत्रे तपासण्यास सहकार कलम ११ खाली चौकशी करण्यात आम्ही यशस्वी झालो. तरीही ते आमच्यासारखा निकाल लागला म्हणतात आणि विजयाचा दावा करतात. चांगल्या कारभारावरही टीका करतात. यापूर्वी सहवीज प्रकल्पावरही खोटे आरोप केले. आता सर्वजण म्हणतात, प्रकल्प चांगला आहे. त्यामुळे विरोधकांची डोकी फिरलीत काय हे तपासायला पाहिजे. माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, बिद्री साखर कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम ठेवत सहवीज प्रकल्पही यशस्वीपणे सुरू आहे. सभासदांना न्याय मिळवून देण्यात दिल्लीपर्यंत लढाई केली व यशस्वी झालो. मात्र, विरोधक आपण यशस्वी झाल्याचा डांगोरा पिटत आहेत. यावेळी देवराज बारदेस्कर, भीमराव पोवार, प्रकाश पाटील यांची भाषणे झाली. मेळाव्यास ‘बिद्री’चे माजी उपाध्यक्ष गणपतराव फराकटे, सुनीलराज सूर्यवंशी, ए. वाय. पाटील, ‘गोकुळ’चे संचालक विलास कांबळे, माजी संचालक फिरोजखान पाटील, माजी आमदार नामदेवराव भोईटे, संघाचे अध्यक्ष बाळ देसाई, सुनील कांबळे, जि. प. माजी सदस्य राजेंद्र पाटील, दत्तामामा खराडे, वसंत पाटील, धनाजीराव देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर) ‘दादा’ बदली करतील बिद्री साखर कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांकडून बँकेच्या बोर्ड मिटिंगमध्ये मिळते. वाढीव ३00 रुपये देण्यात ‘बिद्री’ सक्षम आहे. मात्र, अधिकारी बोलले आणि ते कळाले तर ‘दादा’ त्यांची बदली करतील, असा टोला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आ. मुश्रीफ यांनी लगावला.