‘कोयना एक्सप्रेस’ कऱ्हाडात थांबणार !

By Admin | Updated: January 13, 2015 00:12 IST2015-01-12T22:42:08+5:302015-01-13T00:12:23+5:30

उद्या तीन तासांचा ‘ब्लॉक’ : मसूर-तारगावदरम्यान रेल्वे फाटकाच्या बोगद्याचे काम

'Koyna Express' will stop in Karhad! | ‘कोयना एक्सप्रेस’ कऱ्हाडात थांबणार !

‘कोयना एक्सप्रेस’ कऱ्हाडात थांबणार !

कऱ्हाड : मसूर-तारगाव येथे रेल्वे फाटकाच्या ठिकाणी बोगदा तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने बुधवारी कोल्हापूरहून मुंबईला जाणारी कोयना एक्सप्रेस कऱ्हाड स्थानकात तीन तास थांबविण्यात येणार आहे. काम आटोपल्यानंतर दुपारी २.२५ वाजता कोयना एक्सप्रेस मुंबईकडे धावणार असल्याची माहिती स्थानकाचे प्रबंधक स्वामी यांनी दिली.
कऱ्हाड तालुक्यात ठिकठिकाणी रेल्वे फाटक आहेत. संबंधित फाटकांवर कर्मचारी नसल्याने रेल्वे आल्यानंतर रस्त्यावरील वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. तसेच अपघाताची भीतीही निर्माण होते. मसूर-तारगावदरम्यान असलेल्या फाटकाच्या ठिकाणी बोगदा तयार करणे गरजेचे होते. त्याला मंजुरी मिळाली असून, बुधवारी त्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूरहून मुंबईला जाणारी कोयना एक्सप्रेस ओगलेवाडी रेल्वे स्थानकात थांबविण्यात येणार आहे. सकाळी ११.१० ते दुपारी २.२५ पर्यंत कोयना एक्सप्रेस स्थानकात थांबेल. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ती मुंबईकडे मार्गस्थ होईल, असे प्रबंधक स्वामी म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Koyna Express' will stop in Karhad!