लोकवर्गणीतून उभारलेले कोविड सेंटर रुग्णांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:02+5:302021-05-31T04:18:02+5:30

दानोळी : येथील तरुणांनी लोकवर्गणीतून उभारलेले कोविड सेंटर रुग्णांना दिलासादायक असून तरुणांनी एकत्र येऊन समाजोपयोगी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद ...

Kovid Center erected from the crowd to support the patients | लोकवर्गणीतून उभारलेले कोविड सेंटर रुग्णांना आधार

लोकवर्गणीतून उभारलेले कोविड सेंटर रुग्णांना आधार

दानोळी : येथील तरुणांनी लोकवर्गणीतून उभारलेले कोविड सेंटर रुग्णांना दिलासादायक असून तरुणांनी एकत्र येऊन समाजोपयोगी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.

दानोळी येथील कोविड केअर सेंटरच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. घाटगे पुढे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबर तरुणाई पुढाकार घेत आहे. आजच्या स्थितीत निश्चितच हे कौतुकास्पद आहे. अशा तरुणांच्या पाठीशी मी कायमपणे उभा असून अशा सामाजिक कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे.

यावेळी सुकुमार सकाप्पा यांनी कोविड सेंटरची माहिती दिली. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राम शिंदे, महादेवराव धनवडे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, बापुसो दळवी, उपसरपंच सुनील शिंदे, गुंडू दळवी, सतीश मलमे, रामचंद्र वाळकुंजे, गणेश साळोखे, अमित दळवी, उदय राऊत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Kovid Center erected from the crowd to support the patients