शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जेईई मेन्समध्ये कोल्हापूरच्या सहाजणांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 10:52 IST

JEEM Exam Kolhapur- संयुक्त प्रवेश परीक्षेतील (जॉईंट एंटरन्स एक्झाम (जेईई मेन्स) पहिल्या टप्प्याचा निकाल सोमवारी सायंकाळी ऑनलाईन जाहीर झाला. त्यात कोल्हापूरच्या सहा विद्यार्थ्यांनी ९१ पर्सेंटाईलहून अधिक गुणांची कमाई करत बाजी मारली आहे. त्यात एंजेल जसनानी, आकाश सिंग, मिलिंद माळी, झोया तांबोळी, समृद्धी पाटील आणि गौरी कारंजकर यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देजेईई मेन्समध्ये कोल्हापूरच्या सहाजणांची बाजी ९१ पर्सेंटाईलहून अधिक गुण : पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा निकाल जाहीर

कोल्हापूर : संयुक्त प्रवेश परीक्षेतील (जॉईंट एंटरन्स एक्झाम (जेईई मेन्स) पहिल्या टप्प्याचा निकाल सोमवारी सायंकाळी ऑनलाईन जाहीर झाला. त्यात कोल्हापूरच्या सहा विद्यार्थ्यांनी ९१ पर्सेंटाईलहून अधिक गुणांची कमाई करत बाजी मारली आहे. त्यात एंजेल जसनानी, आकाश सिंग, मिलिंद माळी, झोया तांबोळी, समृद्धी पाटील आणि गौरी कारंजकर यांचा समावेश आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जेईई मेन्स ही परीक्षा दि. २३ फेब्रुवारीपासून सुरू झाली. ही परीक्षा मे महिन्यादरम्यान विविध चार सत्रांमध्ये आणि १३ भाषांमध्ये होणार आहे. बी.ई., बी.टेक्‌., बी. आर्किटेक्ट, प्लॅनिंग या अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेचे स्वरूपही बदलले आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षा दि. २३ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने झाली. या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यात कोल्हापूर शहरातील एंजेल जसनानी याने ९८.४४ पर्सेंटाईल मिळविले.

शिरोलीमधील आकाश सिंगने ९६.१८ पर्सेंटाईल, सांगरुळ परिसरातील मिलिंद माळी याने ९२.९० पर्सेंटाईल, कोल्हापूर शहरामधील झोया तांबोळी हिने ९२.२६, वडणगे येथील समृद्धी पाटील हिने ९१.५४, तर संभाजीनगर परिसरातील गौरी कारंजकर हिने ९१.१६ पर्सेंटाईलची कमाई करत बाजी मारली. हे सर्वजण इन्स्पायर ॲकॅडमीचे विद्यार्थी आहेत. त्यांना या ॲकॅडमीच्या संस्थापक वर्षा संकपाळ, वासू गुडुरी, दीपक गुप्ता, शुभम कुमार बन्सल, आदींचे मार्गदर्शन लाभले.परीक्षेचा दुसऱ्या टप्पा १५ मार्चपासूनया जेईई मेन्स परीक्षेचा दुसरा टप्पा दि. १५ ते १८ मार्चदरम्यान होणार आहे. दि. २७ ते ३० एप्रिल या कालावधीत तिसरा, तर दि. २४ ते २८ मेदरम्यान चौथा टप्पा होईल.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र