Kolhapur ZP Election Results 2026: उचगाव जिल्हा परिषदेत भाजपचे नामदेव वाइंगडे, भादोलेतून काँग्रेसच्या सोनाली सावंत विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:33 IST2026-02-09T11:32:59+5:302026-02-09T11:33:30+5:30

कागलमध्ये शिंदेसेनेचे नेते, माजी खासदार संजय मंडलिक यांना धक्का

Kolhapur ZP Election Results 2026 BJP Namdev Waingde wins in Uchgaon Zilla Parishad, Congress's Sonali Sawant wins from Bhadole | Kolhapur ZP Election Results 2026: उचगाव जिल्हा परिषदेत भाजपचे नामदेव वाइंगडे, भादोलेतून काँग्रेसच्या सोनाली सावंत विजयी

Kolhapur ZP Election Results 2026: उचगाव जिल्हा परिषदेत भाजपचे नामदेव वाइंगडे, भादोलेतून काँग्रेसच्या सोनाली सावंत विजयी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार महायुतीसहकाँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेती आहे. भाजप, शिंदेसेना दोन-दोन जागांवर आघाडीवर आहे. तर जनसुराज्य पक्षाचे तीन उमेदवार आघाडीवर आहेत. 

विजयी उमेदवारांची नावे -

घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार विजयी
घुणकी पंचायत समिती जनसुराज्यच्या कल्याणी राजवर्धन मोहिते विजयी
पंचायत समिती नवे पारगावमध्ये काँग्रेसचे भारत विरधवल पाटील विजयी
नवे पारगाव पंचायत समिती काँग्रेसचे भारत पाटील विजयी

याठिकाणी आमदार विनय कोरे यांना बालेकिल्ल्यात धक्का बसला. घुणकी बरोबर सातवे जिल्हा परिषद मतदार संघ आणि पंचायत समितीत जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारांचा पराभव झाला. 

गडहिंग्लज

गडहिंग्लज तालुक्यातील नूल जिल्हा परिषद मतदारसंघात अनिरुद्ध रेडेकर विजयी 

Maharashtra ZP Election Result 2026 Live: जिल्हा परिषद निकालात राष्ट्रवादीची घोडदौड; भाजपा अव्वल, 'घड्याळ' दुसऱ्या क्रमांकावर...

आजरा

उत्तूर पंचायत समितीमधून राष्ट्रवादीचे विकास चोथे विजयी
जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे शिरीष देसाई आघाडीवर

पन्हाळा

सातवे राष्ट्रवादी ३ विजयी

सातवे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जयंत पाटील विजयी
सातवे पंचायत मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माणिक पाटील विजयी
माले पंचायत समिती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या भारती पाटील विजयी

करवीर
शिये - हमु पाटील (काँग्रेस विजयी)
वडणगे - इंद्रजित पाटील (शिंदेसेना विजयी)
गडमुडशिंगी - तानाजी पाटील (भाजप विजयी)
उचगाव -  नामदेव वाईंगडे  (भाजप विजयी)

कडगांव जिल्हा परिषद 
सारिका यशवंत नांदेकर विजयी (शिंदेसेना) 
पंचायत समिती गण
अरूणा प्रशांत देसाई विजयी (शिंदेसेना) 
मठगांव गण
धनंजय मधुकर लाड विजयी (शिंदेसेना) 

कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसची विजयी घोडदौड 

  • काँग्रेसने १२ जागावर विजय मिळवला
  • दुसऱ्या क्रमांकवर राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागा मिळवल्या 
  • भाजप ७, शिवसेना ७, जनसुराज्यने ४ जागा मिळवल्या 
  • ठाकरे २ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एक


जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेला बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघातून राष्ट्रवादीच्या शोभाताई फराकटे विजयी. तर बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या राजकुंवर गायकवाड विजयी

उत्तूर जिल्हापरिषद गटातून : शिरिष देसाई (राष्ट्रवादी),  उत्तूर पंचायत समिती विकास चोथे (राष्ट्रवादी), भादवण पंचायत समिती : राजश्री गाडे : राष्ट्रवादी विजयी

कागलमध्ये शिंदेसेनेचे नेते, माजी खासदार संजय मंडलिक यांना धक्का

कागलमध्ये जिल्हा परिषदेच्या सहाही जागांवर मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे, संजयबाबा घाटगे गटाच्या उमेदवारांचा विजय झाला. पंचायत समितीच्या ११ जागांवर मुश्रीफ-घाटगे गटाने बाजी मारली आहे. शिंदेसेनेचे नेते संजय मंडलिक यांच्या वाटेला केवळ १ पंचायत समितीची जागा मिळवता आली.

Web Title : कोल्हापुर जिला परिषद चुनाव: उचगांव, भादोले में भाजपा, कांग्रेस विजयी

Web Summary : कोल्हापुर जिला परिषद चुनाव में महायुति और कांग्रेस को बढ़त। भाजपा और शिंदे सेना दो-दो सीटों पर आगे। जनसुराज्य पार्टी ने तीन सीटें जीतीं। सातवे में राकांपा की जीत, मिश्रित परिणाम दर्शाती है।

Web Title : Kolhapur ZP Election: BJP, Congress Win in Uchgaon, Bhadole

Web Summary : Kolhapur ZP election results show gains for Mahayuti and Congress. BJP and Shinde Sena lead in two seats each. Janasurajya Party wins three. NCP also secures victories in Satve, showcasing a mixed outcome.