शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर अर्बन बॅंकेची फसवणूक, पण तोटा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST

कोल्हापूर: बनावट कोटेशनद्वारे दीड कोटीच्या कर्जाची उचल करून फसवणूक केल्याप्रकरणी कोल्हापूर अर्बन बॅंकेने गोकुळ शिरगावमधील दोघांसह बंगळूरमधील पुरवठादाराविरोधात फिर्याद ...

कोल्हापूर: बनावट कोटेशनद्वारे दीड कोटीच्या कर्जाची उचल करून फसवणूक केल्याप्रकरणी कोल्हापूर अर्बन बॅंकेने गोकुळ शिरगावमधील दोघांसह बंगळूरमधील पुरवठादाराविरोधात फिर्याद दिल्याने गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल झाला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसारच कार्यवाही सुरू असून कर्ज देताना जादा तारण घेतले असल्याने बॅंकेचे काहीही नुकसान होणार नाही, असे अर्बन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश चौगुले यांनी सांगितले.

कोल्हापूर अर्बन बॅंकेच्या गांधीनगर शाखेतून गोकुळ शिरगावमधील बाळासाहेब चंद्राप्पा पाटील व आनंदा बाळासाहेब पाटील यांनी नवीन सीएनसी, व्हीसीएमसी मशीन खरेदी करण्यासाठी दीड कोटीचे कर्ज वर्षभरापूर्वी उचलले होते. बॅंकेनेही मशिनरीसह कर्जदारांची वैयक्तिक प्रॉपर्टी जादा तारण म्हणून आधीच लिहून घेतली आहे. तसेच कर्जदारांकडून कर्ज हफ्त्याची नियमित परतफेडही होत होती. पण मशीन आणून दाखवा, असे बॅंकेकडून वारंवार सांगून देखील या दोन कर्जदारांकडून वारंवार टाळाटाळ होत होती. पूर, लॉकडाऊन आदी कारणे दरवेळी दिली जात होती. दरम्यान, शाखाधिकारी गौरव पाटील यांना शंका आल्याने त्यांनी गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये कर्जदारांनी दिलेल्या कोटेशनप्रमाणे मशीन आहेत का, याची पडताळणी केली, पण त्यांना दोनपैकी एकही मशीन जागेवर आढळून आले नाही. यासंदर्भात त्यांनी बंगळूरमधील पुरवठादार असलेले भरतकुमार जैन यांच्याकडेही चौकशी केली असता, त्यांच्याकडूनही बनावट कोटेशन दिले गेल्याचे स्पष्ट झाले.

कर्जदार आणि पुरवठादार या दोघांनी संगनमताने बॅंकेची फसवणूक केल्याने शाखाधिकारी पाटील यांनीच गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. आता त्याची एक प्रत रिझर्व्ह बॅंकेकडे पाठवली जाणार आहे, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी चौगुले यांनी सांगितले.