शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात कोल्हापूर पोलीस लय भारी!, काय आहे, ‘सीसीटीएनएस’ प्रणाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 11:12 IST

पहिल्या क्रमाकाचे स्थानक जालना पोलीस दलाने पटकावले आहे

तानाजी पोवार

कोल्हापूर : पोलीस विभागातील ‘सीसीटीएनएस’ (क्राईम क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टिम) प्रणालीचे मूल्यमापन गृहविभागाच्यावतीने करून त्याची गुणांकन यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यामध्ये गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात कोल्हापूर हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहे. त्यामध्ये पहिल्या क्रमाकाचे स्थानक जालना पोलीस दलाने पटकावले आहे.

पोलीस दलाचे कार्य गतिमान करण्यासाठी ‘सीसीटीएनएस’ प्रणाली अस्तित्वात आली. कोल्हापूर पोलीस दलाचे ऑगस्ट २०१६ ते जून २०१७ या मुदतीत २०१३-२०१५ सालातील दाखल २०,७३५ प्रथम खबरी अहवालाचे एकूण १ लाख ११ हजार ६३५ फॉर्म भरून ‘सीसीटीएनएस’चे शंभर टक्के डाटा डिजिटायजेशनचे काम पूर्ण केले. त्यामुळे प्रशासकीय कामात गतिमानता आली.‘सीसीटीएनएस’ प्रशिक्षण देऊन जिल्ह्यातील अंमलदारांना प्रशिक्षित केले आहे. प्रणालीचे काम प्रभावीपणे चालविण्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे व नोडल ऑफिसर अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनासाठी ‘सीसीटीएनएस’ कक्ष स्थापन केला आहे. त्यामध्ये महिला पोलीस कविता पाटील, एल. पी. दंडगे, एस. डी. पाटील, जी. डी. जाधव, डी. बी. डावकुरे, पी. बी. गवंडी हे पथक कार्यरत आहे.

गुणांकनात कोल्हापूर पोलीस ९० टक्के अग्रेसर

महाराष्ट्रातील २०१९ मध्ये कोल्हापूर पोलीस दलाने जनरल चॅम्पियनशीपमध्ये दुसरा क्रमांक, सप्टेंबर २०२० मध्ये राज्यात ‘सीसीटीएनएस’मध्ये प्रथम क्रमांक, जुन-जुलै २०२१ मध्ये क्रमवारीत द्वितीय स्थान पटकावले आहे. त्यामुळे ‘सीसीटीएनएस’ प्रणालीच्या मूल्यांकनात कोल्हापूर पोलीस दलाने ९० टक्के गुण संपादन केले आहेत.

वर्षभरात १२ हजारांवर ऑनलाईन गुन्हे

२०२१ या वर्षभरात कोल्हापूर पोलीस दलाच्या ‘सीसीटीएनएस’ प्रणालीत सुमारे ११९४० ऑनलाईन गुन्ह्यांची नोद करण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रणाली गतिमान करण्यात या कक्षानेही गतिमानता घेतली आहे.

काय आहे, ‘सीसीटीएनएस’ प्रणाली

‘सीसीटीएनएस’ प्रणाली ‘आयसीजेसी’द्वारे आरोपींवर कोणत्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत, याची माहिती तत्काळ उपलब्ध होते. त्याची गुन्ह्याच्या पुढील तपासकामी मदत होते. एखाद्या व्यक्तीवर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असतील तर त्याची माहिती मिळते. बेवारस मिळालेल्या वाहनांच्या क्रमांकावरून कोणत्या पोलीस ठाण्यात चोरीची अगर त्यावर कोणता गुन्हा दाखल आहे, याची माहिती मिळते. बेवारस मयत, मिसिंग शोधण्यासाठी वापर होते. पासपोर्ट, चारित्र पडताळणीसाठी व्यक्तीवर गुन्हे दाखल असल्यास त्वरित माहिती मिळते.

‘सीसीटीएनएस’ प्रणालीमुळे कोल्हापूर पोलिसांचे प्रशासकीय काम गतिमान झाले आहे. गुन्हेगारांची माहिती त्वरित उपलब्ध होण्यासाठी या प्रणालीची मोठी मदत होत आहे. या प्रणालीतील कोल्हापूर कक्षाचे काम उत्तमपणे चालू आहे. - शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी