शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : हजारो भाविकांच्या उपस्थितीत उदगांवात रंगला मुकुट खेळ,  बाराशे वर्षाची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 16:14 IST

हलगिचा ठेका, कैताळाचा आवाज, तुतांरीचा शिनगांर साथीने उदगांव येथील श्री जोगेश्वरी यात्रेच्या तिस-या दिवशी पारंपारीक बाराशे वर्षापासुन असलेली मुकुट खेळाविण्याचे परंपरा हजारो भाविकांनी अनुभवली. मुकुटला खिजवून पळत असलेला संवगडी त्याच्या पाठीमागे लागणारा मुकुट हा रंगलेला खेळ भाविकांनी डोळयात टिपला. मुकुट पाहण्यासाठी मोठी गदी झाल्याने, अनुचित प्रकार घडू नये म्हणून जयसिंगपूर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.

ठळक मुद्देहजारो भाविकांच्या उपस्थितीत उदगांवात रंगला मुकुट खेळ,  बाराशे वर्षाची परंपरा जोगेश्वरी यात्रेनिमित्तं विविध धार्मिक कार्यक्रम 

संतोष बामणे

उदगांव (जि.कोल्हापूर) : हलगिचा ठेका, कैताळाचा आवाज, तुतांरीचा शिनगांर साथीने उदगांव येथील श्री जोगेश्वरी यात्रेच्या तिस-या दिवशी पारंपारीक बाराशे वर्षापासुन असलेली मुकुट खेळाविण्याचे परंपरा हजारो भाविकांनी अनुभवली. मुकुटला खिजवून पळत असलेला संवगडी त्याच्या पाठीमागे लागणारा मुकुट हा रंगलेला खेळ भाविकांनी डोळयात टिपला. मुकुट पाहण्यासाठी मोठी गदी झाल्याने, अनुचित प्रकार घडू नये म्हणून जयसिंगपूर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.उदगांव येथील श्री जोगेश्वरी यात्रेच्या तिस-या दिवशी बुधवारी सकाळी सहा वाजता ग्रामदैवत श्री जोगेश्वरी मंदिरातुन मानाच्या असलेल्या मुकुटे बाहेर काढण्यात आली. यावेळी मुकुट धरण्याचा मान झ्र सुरज आंबी, गुंडू कोळी, कुबेर सुतार, सतीश कुंभार यांना मिळाला. यात एक नर व दोन मादीचे मुकुट व एक सूपाचा सहभाग होता.प्रथम जागेश्वरी मंदिर ते परीटाच्या कमानीपर्यत मुकुट खेळविण्यात आले. यामध्ये डोक्यावर मुकुट, हातात वेताची काठी व पाठीमागून धरणारा व्यक्ती असतो. यावेळी मुकुटाला खिजवून पळणा-या अनेक सवंगडयानी मुकुट धा-यांचा हातातील वेताच्या काठीचा मार झेलला.

अशा प्रकारे अनेक तरुण, शालेय मुले, तसेच अनेक भाविकांनी मुकुटाला खिजवून मुकुट खेळ खेळून उत्साह वाढविला. एखादया संवगडयाने मार खाल्यानंतर गर्दीतुन टाळा व शिटटयासह उत्साह वाढत होता. तर मुकुट खेळ ग्रामपंचायत व गावचावडी, गणपती मंदिर असा प्रकारे महादेवी मंदिरापर्यत खेळविला जाते.

दरम्यान, गणपती व महादेवी मंदिराजवळ मुकुट आल्यावर मोठया प्रमाणात हजारोच्या संख्येने नागरीकांनी गर्दी केली होती. त्यांनतर मारुती मंदिराजवळ मुकुट आल्यानंतर अनेक खेळ खेळविण्यात आले. त्यांनतर बाराच्या सुमारास मुकुटांकडून नारळ देण्यात आला.

मुकुटासमोर जाऊन तरूणांनी मुकुटांची काठी न खाता नारळ उचलल्यानंतर मुकुटाचा विविध धार्मिक मानपान करुन मुकुट खेळाची सांगता करण्यात आली. त्यांनतर मुकुटे जोगणी मंदिरात नेण्यात आली. यावेळी शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्रं पाटील-यड्रावकर यांनी भेट दिली. तर उदगांव ग्रामपंचायत व यात्रा कमिटीकडुन चांगले नियोजन करण्यात आले आहे.बारा बलूतेदारांना मिळाला मानउदगांव येथील श्री जोगेश्वरी यात्रेत मादनाईक देसाई दिव्यांना नाव दिले, मानकरी पाटील- वाटी धरली. माने सरकार जोगणीचे संरक्षक तलवार धरली. मगदुम नारळ फोडणे. कुंभार जोगण्या तर न्हवी- जोग्या. आंबी-सुतार-कोळी-चांभार-महार-मांग- पिशे, परीट- जोधळयाचा चौक, मांग तोरण बांधणे, चांभार-दिवटी धरणे, महार- थळयातील पुजा असा प्रकारे बारा बलूतेदारांना मान मिळाला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरReligious programmeधार्मिक कार्यक्रमTempleमंदिर