आग्रा येथील राष्ट्रीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापूरचे खेळाडू रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:24 IST2021-02-10T04:24:07+5:302021-02-10T04:24:07+5:30

कोल्हापूर : आग्रा उत्तरप्रदेश येथे होण्याऱ्या राष्ट्रीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापूरातील खेळाडू मंगळवारी रवाना झाले. आग्रा उत्तरप्रदेश येथे ...

Kolhapur players leave for National Tennis Ball Cricket Tournament in Agra | आग्रा येथील राष्ट्रीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापूरचे खेळाडू रवाना

आग्रा येथील राष्ट्रीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापूरचे खेळाडू रवाना

कोल्हापूर : आग्रा उत्तरप्रदेश येथे होण्याऱ्या राष्ट्रीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापूरातील खेळाडू मंगळवारी रवाना झाले.

आग्रा उत्तरप्रदेश येथे ९ ते १२ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत होणाऱ्या या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र टेनिस बॉल संघामध्ये निवडण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये कोल्हापूर येथील सौमिल्य संग्रामसिंह पाटील, शेखर मुकुंद पाटील, दीपक कृष्णा शेवाळे, साहिल सुनील चव्हाण, राज प्रभाकर चौगुले, स्वरूप रवींद्र पाटील , निरंजन अमर पाटील, जय आमिष पटेल, ऋतुराज दिनकर मस्कर या खेळाडूंचा समावेश आहे.

या सर्वाना भारतीय टेनिस बॉल फेडरेशनचे चेअरमन डॉ. महमद बाबर, कोल्हापूर ज़िल्हा असोसिएशनचे रियाज शमनजी, विनय जाधव, अशोक अण्णा चराटी, योगेश पाटील, डॉ. ए. एन. सादळे, राजीव टोपले, डॉ. डी. जे. पाटील, अल्बर्ट फर्नांडिस, जयदीप जाधव यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

(संदीप आडनाईक)

Web Title: Kolhapur players leave for National Tennis Ball Cricket Tournament in Agra