कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेवर सर्वाधिक ४५ जागा जिंकून महायुतीने अखेर आपला झेंडा फडकविला. भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अशा तिघांनी एकत्र येऊन महायुती म्हणून ही निवडणूक लढविली, तरीही काँग्रेस पक्षाने त्यांना एकाकी कडवी झुंज देत ३४ जागांपर्यंत मजल मारली. महायुतीत सर्वाधिक २६ जागांवर भाजपने बाजी मारली असल्याने स्वाभाविकपणे त्यांच्याकडून महापौरपदावर दावा केला जाऊ शकतो. त्यामुळे भाजपचा महापौर होणे, ही कोल्हापूरच्या इतिहासातील पहिलीच घटना असेल.कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक अतिशय चुरशीने लढली गेली. एका- एका जागेसाठी जोरदार रस्सीखेच झाली. आमदार सतेज पाटील यांच्या ताब्यातून महापालिका काढून घेणे तसे अवघड काम होते. त्यामुळे महायुतीने अतिशय सावधपणे व्यूहरचना आखून त्यांच्याशी दोन हात केले. वेगवेगळे लढल्यास यश मिळणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे महायुती करण्याचा तिन्ही पक्षांनी ठाम निर्धार केला होता, तसेच बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवारांची यादीही अगदी शेवटच्या क्षणी जाहीर केली होती. उमेदवारी देण्यापासून ते मतदानापर्यंत अत्यंत सावध हालचाली करीत विजयापर्यंत पोहोचण्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले.शिवशाहू आघाडीचा दारुण पराभवमहाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या आप, राष्ट्रवादी शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी यांनी शिवशाहू आघाडी स्थापन करून आपल्या अस्तित्वाची लढाई स्वीकारली; परंतु त्यांचा दारुण पराभव झाला. एकही जागा त्यांना जिंकता आली नाही.या माजी नगरसेवकांची बाजीया निवडणुकीत दोन माजी महापौरांसह ४९ माजी नगरसेवक रिंगणात उतरले होते. २३ जणांना याही निवडणुकीत विजय संपादन करता आला, तर २६ जणांना पराभवाला सामोरे जावे लागले. विजय मिळविलेल्यांमध्ये सुभाष बुचडे, अर्चना पागर, स्वाती यवलुजे, पल्लवी देसाई, अर्जुन माने, राजेश लाटकर, प्रतिज्ञा उत्तुरे, संजय मोहिते, प्रतापसिंह जाधव, अनुराधा खेडकर, इंद्रजीत बोंद्रे, संगीता सावंत, शारंगधर देशमुख, अर्चना कोराणे, जयश्री चव्हाण, माधुरी नकाते, आदिल फरास, नियाज खान, विनायक फाळके, प्रवीण केसरकर यांचा समावेश आहे.या माजी नगरसेवकांना पराभवाचा धक्कापराभूत झालेल्या माजी नगरसेवकांत भूपाल शेटे, मधुकर रामाणे, प्रकाश पाटील, राहुल माने, राजू दिंडोर्ले, दिलीप पोवार, ईश्वर परमार, प्रकाश नाईकनवरे, स्मिता माने, संजय निकम, तेजस्विनी घोरपडे, नंदकुमार मोरे, उमा बनछोडे, पूजाश्री साळोखे, विजय साळोखे, दत्ताजी टिपुगडे, दीपा मगदूम, महेश सावंत, यशोदा मोहिते, शारदा देवणे, रमेश पुरेकर, प्रेमा डवरी, विलास वास्कर, पद्मावती पाटील, शोभा कवाळे, रशीद बारगीर यांचा समावेश आहे.दोन माजी महापौर विजयीएकदा महापौर झाल्यानंतर पुन्हा विजय मिळत नाही, असे मानले जात होते; परंतु माधवी गवंडी, स्वाती यवलुजे या दोन माजी महापौरांनीही बाजी मारली, तसेच माजी महापौर निलोफर आजरेकर यांचे पती आश्कीन आजरेकर, माजी महापौर हसीना फरास यांचे सुपुत्र आदिल फरास, कांचन कवाळे यांचे सुपुत्र रोहित कवाळे हे विजयी झाले.पती विजयी, पत्नीचा पराभवकाँग्रेसचे माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे यांनी विजय मिळविला, तर त्यांच्या पत्नी मयूरी बोंद्रे यांना पराभव स्वीकारावा लागला. माजी नगरसेवक राहुल माने यांचा पराभव होत असताना त्यांच्या पत्नी ऋग्वेदा माने यांनी विजय मिळविला. माजी उपमहापौर भूपाल शेटे व त्यांची कन्या पूजा शेटे या दोघांचाही पराभव झाला.आमदार पुत्राचा दणकेबाज विजयआमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी दणकेबाज विजय हासील केला. त्यांचे प्रतिस्पर्धी हॉकीपट्टू विजय साळोखे सरदार यांनी प्रचारादरम्यान मोठी हवा केली होती. सोशल मीडियावरील प्रचाराने येथील लढतीची रंगत अधिकच वाढली होती. सरदार यांच्या हाती हॉकी स्टिक असतानादेखील शेवटी क्षीरसागर यांनीच विजयाचा ‘गोल’ मारला.मुद्दे ठरले निर्णायक१. गेल्या पाच वर्षांत महायुतीने आणलेला विकास निधी व केलेल्या विकासकामांची मतदारांसमोर केलेली वास्तव मांडणी.२. राज्यात, देशात महायुतीचे सरकार असल्याने महापालिकेत सत्ता दिल्यास भविष्यात मोठा विकास निधी आणण्याचे दिलेले आश्वासन३. इतकी वर्षे सत्तेत असूनही काँग्रेस पक्षाने शहराचा कोणताही विकास केला नाही यावर प्रचारादरम्यान दिलेला जोर४. काँग्रेस पक्षाकडे सत्ताच नसल्याने कोल्हापूरसाठी विकास निधी कोठून आणणार, या प्रचाराचा परिणाम झाला.५. थेट पाइपलाइनमधील भ्रष्टाचाराचे झालेले आरोप, कोल्हापूरकरांवरील टोल रद्द केल्याची करून दिलेली आठवण
या प्रस्थापितांना बसला धक्का- भूपाल शेटे - काँग्रेस प्रभाग क्रमांक १८ ड- मधुकर रामाणे - काँग्रेस, प्रभाग क्रमांक १९ ड- नंदकुमार मोरे - शिंदेसेना, प्रभाग क्रमांक ६ ड- प्रकाश नाईकनवरे - शिंदेसेना, प्रभाग क्रमांक १४ क- राजू दिंडोर्ले - काँग्रेस पुरस्कृत, प्रभाग क्रमांक २० ड
सर्वांत तरुण नगरसेवक
- मानसी सतीश लोळगे (वय २३) प्रभाग १९ ब, राष्ट्रवादी (अजित पवार)
- धनश्री महेश कोरवी (वय २२) प्रभाग १६ ब, काँग्रेस
सर्वांत ज्येष्ठ नगरसेवक
- सुभाष बुचडे (वय ६३), प्रभाग क्रमांक १ अ, काँग्रेस
- रेखा उगवे (वय ६२), प्रभाग क्रमांक १३ ब, भाजप
तरुण तुर्कांचे सभागृहमहापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेले बहुतांशी नवनिर्वाचित नगरसेवक ४० वर्षांच्या आतील आहेत. त्यामुळे सभागृहात तरुणांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.
पक्ष -- आत्ता मिळविलेल्या जागा -- गेल्या वेळी जागा -- वाढ/घट
- काँग्रेस - ३४ -- ३० -- ०४
- भाजप - २६ -- १४ -- १२
- ताराराणी आघाडी -- ०० -- १९ -- ००
- शिंदेसेना - १५ -- ०४ -- ११
- राष्ट्रवादी - ०४ -- १४ -- १० -
- उद्धवसेना -०१ -- ०० -- ०१
- जनसुराज्य - ०१-- ०० -- ०१
Web Summary : Mahayuti won Kolhapur Municipal Corporation with 45 seats. Congress secured 34, becoming the largest single party. BJP won 26 seats. Manasi Lolge and Dhanashree Korvi are the youngest corporators.
Web Summary : महायुति ने 45 सीटों के साथ कोल्हापुर नगर निगम जीता। कांग्रेस ने 34 सीटें हासिल कीं और सबसे बड़ी पार्टी बनी। बीजेपी ने 26 सीटें जीतीं। मानसी लोळगे और धनश्री कोरवी सबसे कम उम्र की पार्षद हैं।