शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

कोल्हापूर : सीपीआरमध्ये थॅलेसेमियाची औषधे लवकरच उपलब्ध करु :सुधीर नणंदकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 3:44 PM

कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) थॅलेसेमिया रुग्णांची औषधे लवकरच उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सोमवारी येथे दिले.

ठळक मुद्दे सीपीआरमध्ये थॅलेसेमियाची औषधे लवकरच उपलब्ध करु :सुधीर नणंदकरकोल्हापूर जिल्हा थॅलेसेमिया निर्मुलन समितीची मागणी

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) थॅलेसेमिया रुग्णांची औषधे लवकरच उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सोमवारी येथे दिले.कोल्हापूर जिल्हा थॅलेसेमिया निर्मुलन समितीच्या शिष्टमंडळाने थॅलेसेमिया रुग्णांना औषधांचा अपुरा पुरवठा होत आहे. त्यासाठी रुग्णांच्या पालकांना सातारा येथील रुग्णालयातून औषधे घेऊन यावे लागतात असल्याचे समितीचे अध्यक्ष धनंजय नामजोशी यांनी यावेळी सांगितले.कोल्हापूर जिल्हयासह परजिल्हयातून थॅलेसेमिया रुग्णांसाठी उपचाराबाबतचे कार्य सीपीआरमध्ये सुरु आहे. या रुग्णांना आवश्यक असणारी काही औषधे आहेत , ही औषधे जर वेळेत दिली नाहीत तर हे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. पण ; सीपीआरमधून औषधांचा पुरवठा होत नाही.

याबाबत थॅलेसेमिया रुग्णांच्या पालकांनी समितीबरोबर चर्चा केली. गोळ्या मिळत नसल्यामुळे रुग्णांनचा याचा त्रास होतो. फेरिटीनचे प्रमाण वाढत चालले आहे. एच.बी.चे प्रमाण कमी होत आहे. त्याचबरोबर ही औषध सातारा येथील रुग्णालयातून पालक घेऊन येतात. त्यामुळे नियमितपणे रुग्णालयात औषधे उपलब्ध करुन द्यावीत अशी मागणी निवेदनाद्वारे केली.दरम्यान, सीपीआरमध्ये स्वतंत्र थॅलेसेमिया रुग्णांसाठी वॉर्ड सुरु केल्याबद्दल अधिष्ठाता डॉ. नणंदकर व डॉ. वरुण बाफना यांचा यावेळी समितीतर्फे सत्कार करण्यात आला.शिष्टमंडळात उपाध्यक्ष रणजित जाधव,अमोल निलाले,रुपाली कुरणे, गोपाळ कुंभार, अनिकेत जाधव,रिना तुरे, अभिजीत बुधले,सुर्यकांत धनवडे यांच्यासह थॅलेसेमिया रुग्णांच्या पालकांचा सहभाग होता.

 

टॅग्स :docterडॉक्टरHealthआरोग्यkolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय