Kolhapur Flood : कोल्हापूर जिल्ह्यातील 74 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणातून 2828 क्युसेक विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 07:31 PM2021-07-26T19:31:05+5:302021-07-26T19:31:34+5:30

Kolhapur Flood : आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणच्या विद्युत विमोचकातून 1400 व सिंचन विमोचकातून 1428 असा एकूण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Kolhapur Flood : 74 dams under water in Kolhapur district; Discharge of 2828 cusecs from Radhanagari Dam | Kolhapur Flood : कोल्हापूर जिल्ह्यातील 74 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणातून 2828 क्युसेक विसर्ग

Kolhapur Flood : कोल्हापूर जिल्ह्यातील 74 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणातून 2828 क्युसेक विसर्ग

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.40 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणच्या विद्युत विमोचकातून 1400 व सिंचन विमोचकातून 1428 असा एकूण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 5 खुला आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव. तुळशी नदी- बीड व आरे, कासारी नदी- यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, बाजार -भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व वालोली. कुंभी नदी- शेनवडे, कळे, वेतवडे व मांडूकली. धामणी नदी- पनोरे, सुळे व आंबर्डे, वारणा नदी- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, चावरे, खोची व दानोळी. कडवी नदी- वाळूर, भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, शिगांव, सवतेसावर्डे व सरुडपाटणे. दुधगंगा नदी- सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, दत्तवाड, सुळंबी, व कसबा वाळवे. वेदगंगा नदी- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली. हिरण्यकेशी नदी- ऐणापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, जरळी व हरळी. घटप्रभा नदी- कानडे सावर्डे, हिंडगाव, तारेवाडी, अडकूर व कानडेवाडी, ताम्रपर्णी नदी- कोवाड, चंदगड, कुर्तनवाडी, हल्लारवाडी व माणगाव, असे एकूण 74 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी - 94.47 दलघमी, वारणा -886.24 दलघमी, दूधगंगा - 590.77 दलघमी, कासारी- 63.51  दलघमी, कडवी - 71.24 दलघमी, कुंभी - 68.60 दलघमी, पाटगाव- 94.93 दलघमी, चिकोत्रा- 40.09 दलघमी, चित्री - 53.41 दलघमी (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी - 32.40 दलघमी, घटप्रभा -  44.17 दलघमी, जांबरे- 23.23 दलघमी, आंबेआहोळ - 30.98 दलघमी. तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 48 फूट, सुर्वे 45.3 फूट, रुई 77.2 फूट, इचलकरंजी 76 फूट, तेरवाड 74.1 फूट, शिरोळ 74.11 फूट तर नृसिंहवाडी बंधाऱ्याची 74.11 फूट इतकी पाणी पातळी आहे.

Web Title: Kolhapur Flood : 74 dams under water in Kolhapur district; Discharge of 2828 cusecs from Radhanagari Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.