शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
4
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
5
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
6
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
7
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
8
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
9
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
10
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
11
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
12
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
13
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
14
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
15
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
16
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
17
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
18
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
19
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
20
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

राज्यासोबतच घटला कोल्हापूर जिल्ह्याचाही ‘क्राइम रेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या वर्षभरात बरेच वाईट प्रसंग घडले असले तरीही जिल्ह्याचा गुन्हेगारीचा आलेख हा २०१९ च्या तुलनेत बऱ्याच ...

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या वर्षभरात बरेच वाईट प्रसंग घडले असले तरीही जिल्ह्याचा गुन्हेगारीचा आलेख हा २०१९ च्या तुलनेत बऱ्याच अंशी घसरला असल्याची समाधानाची गोष्ट आहे. भारतीय दंड संहितेअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे दोष सिद्ध झाले आहेत. जिल्ह्यात वर्षभरात सुमारे १९४ गुन्ह्यांची घट झाली. राज्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातीलही गुन्हेगारी कमी झाल्याचे पोलिसांकडील आकडेवारीवरून सिद्ध होत आहे. गुन्हेगारीची तुलना करता २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये १४ टक्क्यांनी गुन्हेगारी घसरल्याचे दिसून येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचा गुन्हेगारीचा आढावा घेता दरवर्षी गुन्हेगारी प्रमाणात कमालीची वाढ असते; पण गेल्या वर्षी कोरोनामुळे एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत लॉकडाऊनमध्ये नागरिकांना रस्त्यावरून फिरणे मुश्कील बनले होते. परिणामी, घरातूनच बाहेर कोणी पडले नसल्याने घराबाहेरील गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली; पण गृहकलहाच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे महिला अत्याचाराच्या गुन्ह्यातही वाढ झाल्याचे दिसते. गुन्हे सिद्ध होण्याचा दर हा गतवर्षी १६ टक्क्यांनी वाढला. कोल्हापूर जिल्हा तसा सधन आहे, तरीही गतवर्षी मार्चनंतर कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन झाले अन्‌ गुन्हेगारी घटली आहे. ही गुन्हेगारी घटली असली तरी जुगार, दारूबंदी व वाहनांवरील कारवाईच्या गुन्ह्यात कमालीची वाढ झाली. जिल्ह्यात ३१ पोलीस चौक्या व ३० मुख्य पोलीस ठाणे आहेत. यापैकी चंदगड, हातकणंगले पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण मोठे आहे.

गृहमंत्री म्हणतात, राज्याचा क्राइम रेट घटला

१३ टक्क्यांनी वाढला गुन्हे सिद्ध होण्याचा दर, ३,२०० ने घट झाली पोक्सोंतर्गत गुन्ह्यात, ११ टक्क्यांनी घट झाली बलात्काराच्या गुन्ह्यात, ९५९ ने घट झाली महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात.

जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे पोक्सोंतर्गत

जिल्ह्यात पोक्सोंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांत बलात्काराचे गुन्हे अधिक आहेत. या घटनेत अल्पवयीनच बळी ठरत असल्याचे या आकडेवाडीवरून दिसत आहे. २०१९ मध्ये पोक्सोअंतर्गत ७९ गुन्हे पोलिसांकडे नोंदवले; पण त्यानंतर २०२० मध्ये ६४ गुन्हे नोंदवले.

कोल्हापूर जिल्ह्यात काय?

गुन्हे... - २०१९ - २०२०

गुन्हे सिद्ध होण्याचा दर- ४६ टक्के - ६२ टक्के

पोक्सोंतर्गत गुन्हे - ७९ - ६४

बलात्कार गुन्हे - १२६ - ११५

महिला अत्याचार - ९४५ - ९५५

पॉइंटर...

- १६ टक्क्यांनी वाढला गुन्हे सिद्ध होण्याचा दर

- १५ पोक्सोंतर्गत गुन्हे घटले

- १० महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ

- १३ बलात्काराचे गुन्हे घटले