शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अकरा महिन्यांनंतर धावली ‘कोल्हापूर-धनबाद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:09 IST

कोल्हापूर : उत्तर भारतामध्ये जाण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या कोल्हापूर-धनबाद-कोल्हापूर या विशेष रेल्वेचा प्रारंभ शुक्रवारी झाला. कोरोनामुळे थांबलेली ही दीक्षाभूमी एक्स्प्रेस ...

कोल्हापूर : उत्तर भारतामध्ये जाण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या कोल्हापूर-धनबाद-कोल्हापूर या विशेष रेल्वेचा प्रारंभ शुक्रवारी झाला. कोरोनामुळे थांबलेली ही दीक्षाभूमी एक्स्प्रेस अकरा महिन्यांनंतर पुन्हा धावली. त्यातून पहिल्यादिवशी १९३ जणांनी प्रवास केला. त्यात कोल्हापूर, सांगली, मिरज, पंढरपूर येथील प्रवाशांचा समावेश होता.

कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमधून शुक्रवारी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी ही रेल्वे सुटली. मिरज, कुर्डुवाडी, पंढरपूरमार्गे दुपारी तीनच्यासुमारास रेल्वे लातूरमध्ये पोहोचली. ठिकठिकाणी प्रवासी समिती सदस्यांनी तिचे स्वागत केले. परळी-वैजनाथ, परभणी, पूर्णा, नांदेड, अकोला, नागपूर, इटारसी, गया, जबलपूर, पारसनाथमार्गे ही रेल्वे रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास धनबादला पोहोचणार आहे. धनबाद येथून दर सोमवारी सकाळी सव्वादहा वाजता ही रेल्वे निघणार असून, आलेल्या मार्गाने परतीचा प्रवास करत बुधवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास कोल्हापूरला पोहोचणार आहे. या रेल्वेला १९ डबे आहेत. त्यातून प्रवास करण्यासाठी तिकीट आरक्षित करणे आवश्यक आहे.

चौकट

कोल्हापूर-अहमदाबाद, दिल्ली सुरू व्हावी

कोल्हापूर-धनबाद मार्गावर गेल्या तीन वर्षांपूर्वी रेल्वे सुरू झाली. कोरोनामुळे गेल्या अकरा महिन्यांपासून तिची सेवा स्थगित करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मध्य रेल्वेने विशेष रेल्वे म्हणून ही एक्स्प्रेस पूर्ववत सुरू केली. त्याला प्रवाशांंचा चांगला प्रतिसाद आहे. या रेल्वेमुळे काशी, गया, पारसनाथ, पंढरपूर, बार्शी, शेगाव आणि देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. आता कोल्हापूर-अहमदाबाद, कोल्हापूर-दिल्ली रेल्वेही लवकर सुरू करावी, अशी मागणी पुणे रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी केली.