कारचा चक्काचूर, कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांना अपघात; दोघे जागीच दगावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 11:25 IST2026-01-11T11:24:35+5:302026-01-11T11:25:08+5:30
Kolhapur Anti Corruption Bureau DYSP Vaishnavi Patil Accident: जखमींना लगेचच उपचारांसाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कारचा चक्काचूर, कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांना अपघात; दोघे जागीच दगावले
Kolhapur Anti Corruption Bureau DYSP Vaishnavi Patil Accident:कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारला मोठा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ वैष्णवी पाटील यांच्या कारला भीषण अपघात झाला. बंगळूरू येथून कोल्हापूरला परत येत असताना हा अपघात झाला. पहाटेच्या सुमारास वैष्णवी पाटील यांची कार एका लॉरीला धडकली. या धडकेत कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात वैष्णवी पाटील यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. DYSP वैष्णवी पाटील यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत. वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.
दरम्यान, जखमींना उपचारांसाठी तत्काळ चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. DYSP वैष्णवी पाटील यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कार आणि लॉरीच्या जोरदार धडकेत हा भीषण प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.