शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जगातील संशोधनविषयक ज्ञानाचे भांडार खुले : पवार

By admin | Updated: August 1, 2014 00:37 IST

शिवाजी विद्यापीठात अकॅडेमिक रिसोर्स सेंटरचे उद्घाटन

कोल्हापूर : अकॅडेमिक रिसोर्स सेंटरच्या माध्यमातून संशोधक विद्यार्थी, प्राध्यापकांसाठी जगातील संशोधनविषयक ज्ञानाचे भांडार शिवाजी विद्यापीठात खुले झाले आहे. सामाजिक शास्त्रांसह कला शाखांकडील विद्यार्थ्यांनासुद्धा संशोधनाचा दर्जा अधिक वाढविण्यासाठी हे सेंटर उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी आज, गुरुवारी येथे केले.विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातील अकॅडेमिक रिसोर्स सेंटरच्या (शैक्षणिक संदर्भ केंद्र) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.डॉ. पवार म्हणाले, विद्यापीठातील संशोधन अधिकाधिक उपयुक्त व मूलभूत होण्याच्या दृष्टीने या सेंटरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सामाजिक शास्त्रांसह कला शाखांकडील विद्यार्थ्यांनासुद्धा संशोधनाचा दर्जा अधिक वाढविण्यासाठी हे सेंटर उपयुक्त ठरणारे आहे. वाङ्मयचौर्य रोखण्याच्या कामीसुद्धा या सेंटरची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे. याठिकाणी संशोधक विद्यार्थ्यांसाठी भाषा, संवाद तसेच इतर कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण, कार्यशाळांचे आयोजन करता येणार आहे.कार्यक्रमात डॉ. आर. के. कामत यांनी सेंटरच्या कार्यपद्धतीची उपस्थितांना माहिती दिली. त्यानंतर टनिटिन कंपनीच्या अनुराग गुप्ता यांनी वाङ्मयचौर्य ओळखणाऱ्या सॉफ्टवेअरविषयी सादरीकरण केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे, बीसीयुडी संचालक डॉ. अर्जुन राजगे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, इंटरनेट विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद जोशी आदी उपस्थित होते. ग्रंथपाल डॉ. नमिता खोत यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)