शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

के.एम.टी. बसवर ‘जीपीएस’ची नजर

By admin | Updated: November 13, 2014 23:58 IST

हायटेक महानगरपालिका : नियोजनातील अनागोंदीला चाप लावण्याचा प्रयत्न

संतोष पाटील / कोल्हापूरकोल्हापूर म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट (के.एम.टी.)च्या नव्याने खरेदी करण्यात येणाऱ्या सर्व १०४ बसेसवर जी.पी.एस. (ग्लोबल पोझिसिंंग सिस्टीम) प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व बसेस नेमक्या व प्रवाशांची गर्दी असणाऱ्या मार्गावरच फिरताना दिसतील. या प्रणालीचा फायदा प्रवाशांना नेमकी व जलद सेवा देण्याबरोबरच नियोजनातील अनागोंदीला चाप लावून उत्पन्नवाढीसाठीही केला जाणार आहे. बिंदू चौकातील जीपीएस केंद्रातून शहरातील सर्व बसेसवर नियंत्रण ठेवले जाणार असल्याने बसमध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास प्रवाशांना थेट केंद्राशी संपर्क साधता येईल. के.एम.टी.च्या अनेक बसेस एकाच मार्गावरून प्रवाशांशिवाय धावत असल्याचे नेहमीचेच चित्र आहे. बस नेमकी कधी येणार याची खात्री नसल्याने प्रवासी खासगी तसेच अवैध वाहतुकीचा आधार घेतात. डेपोतून बस बाहेर पडल्यानंतर ती पुन्हा डेपोत आल्यानंतरच एकूण दिवसभरात बसने किती गल्ला कमविला याचा आकडा कळतो. दिवसभरात मोठे नुकसान सोसूनही निव्वळ वेळापत्रक ठरले आहे म्हणून बसेस धावत असतात. गर्दीच्या ठिकाणी व झालेला वेळ भरून काढण्यासाठी इतर मार्गांवर भरधाव वेगाने धावणाऱ्या बसेसचीही संख्या मोठी आहे. अनेकवेळा बसथांब्यावर प्रवासी असूनही घेतले जात नाहीत. या सर्व अनागोंदी कारभारास आता जीपीएस प्रणालीमुळे पूर्णविराम मिळणार आहे. ४० बसथांब्यांवर सीसीटीव्ही कॅमेरेकेंद्र सरकारकडून प्राप्त ४४ कोटींच्या निधीतून बसेस खरेदीसाठी करासह ३० ते ३२ कोटींचा खर्च येईल. उर्वरित पैशांत एक डेपो, सर्व बसेसमध्ये जीपीएस सिस्टीम बसविण्यासाठी निविदा मागविली आहे. ई-तिकिटिंग सेवा तसेच ४० बसथांब्यांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. बस येण्यापूर्वी बसथांब्यावरील प्रवाशांना पूर्वसूचना मिळेल. जीपीएसचे फायदे वाहनाच्या नेमक्या ठिकाणाचा तत्काळ शोधइंधन खर्च निम्म्यावरतत्काळ सेवाप्रवाशांच्या सुरक्षितेत वाढवाहनास तत्काळ सूचना देणे शक्य