शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
3
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
4
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
5
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
7
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
8
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
9
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
10
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
11
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
12
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
13
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
14
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
15
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
16
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
17
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
18
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
19
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

केएमसी महाविद्यालयातील सुविधांसाठी निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महानगरपालिकेच्या केएमसी महाविद्यालयातील शैक्षणिक आणि भौतिक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या केएमसी महाविद्यालयातील शैक्षणिक आणि भौतिक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. महाविद्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

आमदार पाटील म्हणाले, महापालिकेच्या माध्यमातून गेली ३८ वर्ष हे महाविद्यालय सुरू आहे. अत्यंत अल्प शुल्कामध्ये या महाविद्यालयाने बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील , आमदार चंद्रकांत जाधव यांचीसुद्धा यासाठी मदत घेणार आहे.

प्राचार्य प्रशांत नागावकर म्हणाले, नॅक समितीने पुनर्मूल्यांकन करताना महाविद्यालयात चांगल्या सुविधा असाव्यात, अशा सूचना केल्या. त्यानुसार अद्ययावत संगणक लॅब, जनरेटर, सीसीटीव्ही, सौरऊर्जा प्रकल्प, मॉडर्न क्लासरूम, संरक्षक भिंत दुरुस्ती, सुशोभिकरण, ग्रंथालय आधुनिकीकरण या सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.

यावेळी उपायुक्त रविकांत आडसुळ, माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, किरण भोसले, प्रा. जे. एम. शिवणकर, प्रा. एस. एम. शेख, पी. डी. तोरस्कर, प्रा. एस. पी. कांबळे, प्रा. रेडेकर आदी उपस्थित होते.

फोटो : ०३०४२०२१-कोल-केएमसी भेट

कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी शनिवारी केएमसी महाविद्यालयाला सदिच्छा भेट देत महाविद्यालयाच्या प्रश्नांची माहिती करून घेतली.