किसनराव मोरे यांची पुण्यतिथी साधेपणाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:24 IST2021-05-17T04:24:10+5:302021-05-17T04:24:10+5:30

कै. मोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेली ४४ वर्षे १४ मे रोजी विविध कार्यक्रम, स्पर्धा, पुरस्कार वितरण करण्यात येत होते. गतवर्षी ...

Kisanrao More's death anniversary simply | किसनराव मोरे यांची पुण्यतिथी साधेपणाने

किसनराव मोरे यांची पुण्यतिथी साधेपणाने

कै. मोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेली ४४ वर्षे १४ मे रोजी विविध कार्यक्रम, स्पर्धा, पुरस्कार वितरण करण्यात येत होते. गतवर्षी व यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी केवळ प्रतिमा पूजन करून अभिवादन केले.

मोरे निवासस्थानी रविवारी दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, उद्योजक विनायक राऊत, उद्योगपती एस. पी. पाटील, डी. एस. पाटील, बाबूराव लाड, सीताराम खाडे, शंकरराव फराकटे, जयवंत पाडळकर, राजेंद्र पाटील, प्राचार्य एस. टी. वरुटे, उपप्राचार्य पी. एस. पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, सदस्य, प्रशासकीय अधिकारी व राधानगरी, भुदरगड तालुक्यातील मोरे प्रेमी कार्यकर्ते यांनी कै. मोरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.

बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे यांनी स्वागत केले. माजी पं. स. सदस्य आर. के. मोरे यांनी आभार मानले.

Web Title: Kisanrao More's death anniversary simply