शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

किसन वीर पुरस्कार पद्मभूषणपेक्षाही मोठा

By admin | Updated: September 5, 2015 23:25 IST

चंद्रशेखर धर्माधिकारी : ‘आबासाहेब वीर’ पुरस्काराने सन्मान

भुर्इंज : ‘किसन वीर यांच्या नावाचा असल्याने आणि शेतकऱ्यांंची संस्था असलेल्या किसन वीर कारखान्याने दिल्यामुळे आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार माझ्यासाठी पद्मभूषण पुरस्कारापेक्षाही मोठा आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक आणि सर्वोदय चळवळीतील अग्रणी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केले. येथील किसन वीर कारखान्याच्या वतीने कारखान्याचे संस्थापक किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते न्या. धर्माधिकारी यांना आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार उपस्थित होते. सन्मानपत्र, एक लाख रुपये रोख, शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. धर्माधिकारी म्हणाले, ‘किसन वीर यांचे कार्यच असे होते की, ते माझ्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यापेक्षाही मोठे होते. किसन वीर कारखाना परिसरात सर्वोदयाचा जागर झाल्याचे दिसून येत आहे. वैभवशाली लग्न संस्कार हा अंत्यसंस्कार ठरतोय, हे अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे हुंडा पद्धत बंद झाली पाहिजे, विवाह सोहळे अतिशय साध्या पद्धतीने झाले पाहिजेत, व्यसनाधीनता हद्दपार केली पाहिजे,’ असा आग्रह त्यांनी आपल्या मनोगतातून मांडला. यावेळी, न्या. नरेंद्र चपळगावकर, उल्हास पवार, मदन भोसल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शहीद जवान सूरज मोरे यांच्या कुटुंबीयास न्या. धर्माधिकारी यांच्या हस्ते एक लाखाचा मदतनिधी देण्यात आला. कार्यक्रमास वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष जयवंत मठकर, डॉ. सुगंध बरंठ, ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, प्रल्हाद चव्हाण, प्रा. संभाजीराव पाटणे, वसंतराव जगताप, प. ना. पोतदार, पै. साहेबराव जाधव, शंकरराव पवार, डॉ. नीलिमा भोसले, भैय्यासाहेब जाधवराव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नंदकुमार निकम यांनी स्वागत केले. मानपत्राचे वाचन अनिल जोशी यांनी केले. स्रेहल दामले व जयवंत पिसाळ यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. प्रताप देशमुख यांनी आभार मानले. (वार्ताहर)