शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

किरणोत्सव आजपासून

By admin | Updated: November 9, 2014 01:09 IST

पूर्वसंध्येला किरणांनी केला चरणस्पर्श

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात उद्या, रविवारपासून किरणोत्सवाला प्रारंभ होत आहे. दरम्यान, किरणोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज, शनिवारी किरणांनी सायंकाळी पाच वाजून ४४ मिनिटांनी अंबाबाईच्या मूर्तीचा चरणस्पर्श केला. गेल्या दोन दिवसांपासूनच्या चाचणीनुसार सूर्यकिरणांचा प्रवास किरणोत्सवाच्या दृष्टीने योग्य दिशेने सुरू असल्याने यंदा भाविकांना पूर्ण क्षमतेने होणारा किरणोत्सव अनुभवता येईल, अशी अपेक्षा आहे. जानेवारी महिन्यात दाट धुके व सूर्यकिरणांची तीव्रता कमी असल्याने किरणोत्सव झाला नव्हता. तत्पूर्वी म्हणजे नोव्हेंबर २०१३ मध्ये तीन दिवस पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होऊन किरणे अंबाबाईच्या चेहऱ्यापर्यंत गेली. त्या पार्श्वभूमीवर उद्यापासूनच्या या सोहळ्याबद्दल उत्सुकता आहे. नोव्हेंबर महिन्यात जानेवारीच्या तुलनेत सूर्यकिरणांची प्रखरता अधिक असल्याने किरणोत्सव होण्याची शक्यता जास्त असते. अंबाबाईचा किरणोत्सव तीन दिवस असला तरी त्याआधीचा एक दिवस आणि नंतरचा एक दिवस अशा पाच दिवसांचे निरीक्षण केले जाते. गेल्या चार-पाच दिवसांपासून विवेकानंद महाविद्यालयाचे प्राध्यापक मिलिंद कारंजकर हे किरणोत्सवाचा अभ्यास करीत आहेत. त्यानुसार आज सायंकाळी गाभाऱ्यातील दिवे मालविले. प्रखर किरणांनी पाच वाजून ४४ मिनिटांनी देवीचा चरणस्पर्श केला आणि नंतर ती मूर्तीच्या डाव्या बाजूला सरकली. कारंजकर यांच्या मतानुसार ढग आडवे आले नाहीत तर उद्या किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)