शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पाऊस गेला...जीव टांगणीला; शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 13:14 IST

पावसाने उसंत घेतल्याने खरीप पिके धोक्यात

कोल्हापूर : गेल्या आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. माळरानावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली असून भुईमूग, नागली, भात पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. रोज उठले की पांढरे शुभ्र आकाश दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. पिकांना मारक तर किडींना पोषक वातावरण असल्याने किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.यंदा वरुणराजाच्या मनात काय आहे, हेच कळेना झाले. जून महिना कोरडा गेला, त्यानंतर जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने पेरण्या होऊ शकल्या. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उघडझाप राहिल्याने पिकांची वाढ सुरू झाली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.विशेषत: माळरानावरील भुईमूग, भात, नागली ही पिके धोक्यात आली आहेत. नदी व विहिरीवरील विद्युत पंपाची वीज सोडवलेली आहे. त्यामुळे जिथे पाण्याची सोय आहे; पण वीज नसल्याने विद्युत पंप सुरू करता येईनात. गेल्या वर्षी २२ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी १०४१ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा तो ७९९ मिलिमीटरवरच थांबला आहे.जिल्ह्यात ९६ टक्के पेरण्याजून महिना कोरडा गेल्याने जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या. जिल्ह्याचे १ लाख ९२ हजार ६३३ हेक्टर पेरक्षेत्र आहे. त्यापैकी यंदा १ लाख ८६ हजार १६७ हेक्टर (९६.७६ टक्के) पेरणी झालेली आहे.

ओढे-नाले आटलेयंदा जुलै महिन्यात ओढ्या-नाल्यांना पाणी आले; मात्र पावसाने दडी मारल्यानंतर त्यातील पाणीही आटले आहे. ओढ्या-नाल्यांतील पाणी माळरानावरील पिकांना आधार असतो. यातच पाणी नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात आकाशाकडे बघण्यापलीकडे काहीच नाही.

‘तांबेरा’, ‘करपा’ किडीचा प्रादुर्भावकिडीला पोषक असेच सध्या वातावरण आहे. त्यामुळे सोयाबीन, भात, भुईमूग पिकांवर ‘तांबेरा’, ‘करपा’ या किडीचा प्रादुर्भाव अधिक जाणवू लागला आहे. उसावरही लोकरी माव्याचे संकट आले आहे. आगामी काळात जोरदार पाऊस झाला नाहीतर हा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता धूसरच

एकूणच हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी आठवडाभर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता धूसर आहे. काही ठिकाणी तुरळक सरी कोसळतील, मात्र शेतीला अपेक्षित पाऊस पडणार नाही.ऑगस्टमध्ये अंगातून घामाच्या धाराऑगस्ट महिन्यात जिल्ह्याचा पारा ३२ डिग्रीपर्यंत पाेहोचला आहे. दुपारी तर अंग भाजून निघत आहे. ऑक्टोबरची हिट जाणवू लागली असून, त्यामुळे अंगाकतून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

गेल्यावर्षीच्या तुलनेत २२ ऑगस्टपर्यंतचे पर्जन्यमान मिलिमीटरमध्येतालुका          २२ ऑगस्ट २०२२    २२ ऑगस्ट २०२३हातकणंगले       ४२९                         ३२१शिरोळ              २६८                         २६०पन्हाळा             ११०२                        ८२९शाहूवाडी          १६५७                       ११४४राधानगरी         १५५१                        १०५२गगनबावडा      ३१४५                        २७२५करवीर             ७८४                         ५८३कागल              ७५४                         ५६१गडहिंग्लज        ६४३                         ४६२भुदरगड           १५७७                      १३७८आजरा             १३०१                        १०७२चंदगड             १५०५                       ११९६

जुलै महिन्यातील पंधरा-वीस दिवसांतील पाऊस वगळता सरासरीच्या कमी पाऊस आहे. एल निनोच्या प्रभावामुळे सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - राहुल पाटील (मुख्य प्रबंधक, हवामान साक्षरता अभियान)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसFarmerशेतकरी