शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचं भूषण असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग; सर्व सामान जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 23:00 IST

जुन्या पद्धतीचे नूतनीकरण करण्यात आल्याने यामध्ये लाकडाच्या सामानाचा मोठा वापर होता आणि बघता बघता केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

कोल्हापूर - शहराचं भूषण असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. सुमारे तासाभरात नाट्यगृहाची निम्म्याच्यावर इमारत जळून गेली होती. रात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू होते. रात्री साडेनऊच्या दरम्यान खासबाग मैदानाकडून ही आग लागल्याचे सांगण्यात आले.

आग एवढी भयानक होती की अग्निशमन दलालाही या ठिकाणी ही आग विझवताना अडचणी येत होत्या. लाकूड सामान, होमच्या खुर्च्या आणि इलेक्ट्रिक वायरिंग यामुळे आग आणखी भडकत गेली. जुन्या पद्धतीचे नूतनीकरण करण्यात आल्याने यामध्ये लाकडाच्या सामानाचा मोठा वापर होता आणि बघता बघता केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी दुर्घटनासंगीत सूर्य केशवराव भोसले यांचे जयंती शुक्रवारी असल्यामुळे शासनाच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांच्यावरील चित्र प्रदर्शन ही मांडण्यात आले होते. तेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार होते. त्या आधीच त्यांची स्मृती असलेले हे केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली. 

टॅग्स :fireआग