शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या कामाचा दर्जा राखा

By admin | Updated: November 21, 2014 00:35 IST

महापौरांचे आदेश : रस्त्यांची पाहणी; रस्त्यांचा निधी खड्ड्यात नको : नागरिकांची मागणी

कोल्हापूर : महापालिकेने शहरातील लहान-मोठ्या १५०हून अधिक रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. १२५ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणारे हे रस्ते दर्जेदार होण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. महापौर तृप्ती माळवी यांनी आज, गुरुवारी अधिकाऱ्यांसह ‘जाऊळाचा गणपती ते रंकाळा स्टँड’ रस्त्याची पाहणी केली. अद्याप कामे सुरू न केलेल्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही महापौरांनी प्रशासनास दिल्या. मागील वेळेप्रमाणे कोट्यवधीचा निधी पुन्हा खड्ड्यात घालू नका, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने घालून दिलेल्या निकषांप्रमाणे कोणत्याही प्रकारचा डांबरी रस्ता किमान पाच वर्षे टिकलाच पाहिजे, असा दंडक आहे. रस्त्यांच्या डागडुजीची जबाबदारी पहिली तीन वर्षे ठेकेदारांची असते. खडीचे अयोग्य प्रमाण, रोलिंग व डांबराचा अभाव, रस्त्यांची असमान पातळी, त्यामुळे शहरातील अनेक रस्ते पहिल्या पावसातच वाहून गेले आहेत. महापालिका प्रशासन व ठेकेदारांच्या साखळीमुळेच शहर ‘डर्ट ट्रॅक’ बनले आहे. गेल्या चार वर्षांत रस्त्यांसाठी तब्बल शंभर कोटींचा चुराडा झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. आता पुन्हा सव्वाशे कोटी रुपये खर्चून रस्त्यांची बांधणी सुरू आहे. नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागल्याने प्रशासन व नगरसेवक खडबडून जागे झाले आहेत.दरवर्षी शहरातील गल्ली-बोळांतील रस्त्यांसाठी किमान दहा ते पंधरा कोटी रुपये खर्च केले जातात. एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, सुवर्णजयंती नगरोत्थान योजना, आमदार-खासदार फंडातून मिळालेला निधी मिळून रस्त्यासाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध होऊनही शहराला खड्ड्यांचे स्वरूप आले आहे. महापालिका प्रशासन व ठेकेदार यांच्यातील मिलिभगतमुळेच रस्त्यांची वाट लागल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौरांनी रस्त्यांच्या कामाची पाहणी करून दर्जा राखण्याबाबत आदेश दिले. (प्रतिनिधी)दर्जा राखण्याची मागणी दर्जा राखण्याची मागणीरस्त्यासाठी व ‘पीडब्ल्यूडी’च्या निकषांनंतर कारपेट, बीबीएम किंवा हॉटमिक्स अशा कोणत्याही प्रकारे केलेला रस्ता किमान पाच वर्षे टिकलाच पाहिजे. मात्र, शहरातील कोणताही रस्ता कसाबसा एक पावसाळा टिकतो. ‘नाबार्ड’सारख्या संस्थेकडून केलेले रस्ते पाच-पाच वर्षे टिकतात. शहरातील रस्त्यावरच टिकाऊ पाया असतानाही रस्त्यांची चाळण का होते? याकडे मात्र सोपस्कारपणे दुर्लक्ष केले जाते. उच्च तंत्रज्ञानाला बगल देत खडी व डांबराचे व्यस्त प्रमाण वापरून शहरातील गल्ली-बोळांत डांबर फासण्याचा पुन्हा उद्योग करू नये, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.