शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा कारागृहात कैद्याला मारहाण

By admin | Updated: July 11, 2014 00:41 IST

अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार केल्याच्या रागातून कृत्य

कोल्हापूर : पत्नीच्या हत्येप्रकरणी २००३ पासून कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला काही अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून चार ते पाच कैद्यांनी जबर मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून, त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.अनिल पवार (रा. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) असे त्याचे नाव आहे. कैदी पवार हा कारागृह प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या विरोधात वारंवार तक्रारी करीत असे. त्यातून त्याला चार दिवसापुर्वी मारहाण झाली असल्याची चर्चा आहे. अनिल पवार हा पत्नीच्या हत्येप्रकरणी २००३ पासून कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. कारागृहातच अभ्यास करून तो एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण करीत आहे. काही दिवसांपूर्वी चार ते पाच कैद्यांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यामध्ये तो बेशुद्ध पडून त्याचा एक हात फ्रॅक्चर झाल्याने प्रशासनाने त्याला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर वडील आजारी असल्याचे कारण सांगून कैदी पवार याची मुलगी प्रियांका हिला कोल्हापूरला बोलवून घेतले. तिने सीपीआरमध्ये येऊन वडील पवारकडे तब्येतीची विचारपूस केली असता त्याने आपणाला करागृहात इतर चार ते पाच कैद्यांनी मारहाण केली आहे. कारागृहातील काही अधिकाऱ्यांचा त्यांना पाठिंबा आहे. मी आजारी पडल्याचे ते खोटे सांगत आहेत, असे सांगितले. हे ऐकून प्रियांकाला धक्काच बसला. तिने कारागृह अधिकाऱ्यांकडे याप्रकरणी जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. (प्रतिनिधी)