शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमाग कामगारांचा मोर्चा

By admin | Updated: June 13, 2015 00:13 IST

प्रांत कार्यालयावर धडक : किमान वेतन, कल्याणकारी मंडळ, घरकुल अनुदानाची मागणी

इचलकरंजी : यंत्रमाग व्यवसायातील कामगारांना सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी करा, कल्याणकारी मंडळ, घरकुल अनुदान अशा मागण्यांसाठी शुक्रवारी यंत्रमाग कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, या मोर्चाच्यावतीने आमदार सुरेश हाळवणकर यांनाही या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.२९ वर्षे प्रलंबित असलेला किमान वेतनाचा प्रश्न २९ जानेवारी २०१५ रोजी निकालात निघाला. त्याची फेररचना करण्यात आली. मात्र, अद्याप अंमलबजावणी झाली नाही. शासन व मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबून अंमलबजावणीसाठी टाळाटाळ करीत आहेत. आरोग्य विमा, ग्रॅज्युईटी, पेन्शन या सुविधा मिळण्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणीही अद्याप मंजूर झालेली नाही. यासंदर्भात २० मे रोजी मुंबईत मोर्चा काढून हजारो कामगारांच्या उपस्थितीत नरसय्या आडाम मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यावेळी पंधरा दिवसांच्या आत अंमलबजावणी करतो, असे आश्वासन दिले. मात्र, अद्याप अंमलबजावणी झाली नाही.आठ तास काम हा कामगारांचा अधिकार डावलून त्यांना बारा तास राबवून घेतले जात आहे. जादा चार तास केलेल्या कामाचा दुप्पट मोबदलाही दिला जात नाही. तरी या सर्व मागण्यांबाबत ३० जूनपर्यंत योग्य निर्णय करावा; अन्यथा १ जुलैनंतर महाराष्ट्रभर आंदोलन पेटेल, असा इशारा देण्यात आला आहे.प्रांताधिकारी जिरंगे यांनी संबंधित मागण्या प्रशासनाच्या पातळीवर शासनाला कळविण्याचे आश्वासन दिले. शाहू पुतळ्यापासून मोर्चा मुख्य मार्गाने फिरून के. एल. मलाबादे चौक, गांधी पुतळा ते प्रांत कार्यालय असा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व दत्ता माने, ए. बी. पाटील, सुभाष निकम, शिवाजीराव भोसले, हणमंत लोहार, मारुती आजगेकर, परशुराम आगम, राजेंद्र निकम, केराप्पा चव्हाण यांनी केले. यावेळी विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते. (वार्ताहर)पंधरा दिवसांत मंडळाची स्थापनायाबाबत आमदार हाळवणकर यांनी कल्याणकारी मंडळाची स्थापना होऊन सुताच्या खरेदीवरील सेस कट होऊन कल्याणकारी मंडळाला मिळेल, येत्या पंधरा ते वीस दिवसांत याची स्थापना होईल, असे आश्वासन दिले. तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात कामगारमंत्र्यांबरोबर महाराष्ट्रातील चार यंत्रमाग व्यवसायाच्या परिसरातील आमदारांना बरोबर घेऊन कामगार प्रतिनिधींची बैठक लावली जाईल. यामध्ये अन्य मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन केले जाईल, असे आश्वासन दिले.