वाहनामध्ये बेकायदेशीर गॅस भरताना कदमवाडीत छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:30 IST2021-09-15T04:30:06+5:302021-09-15T04:30:06+5:30

कोल्हापूर : घरगुती वापरातील सिलिंडर टाकीमधील गॅस बेकायदेशीर वाहनामध्ये भरुन देताना पोलिसांनी कदमवाडी येथे छापा टाकून दोघांवर कारवाई केली. ...

Kadamwadi raid while filling illegal gas in the vehicle | वाहनामध्ये बेकायदेशीर गॅस भरताना कदमवाडीत छापा

वाहनामध्ये बेकायदेशीर गॅस भरताना कदमवाडीत छापा

कोल्हापूर : घरगुती वापरातील सिलिंडर टाकीमधील गॅस बेकायदेशीर वाहनामध्ये भरुन देताना पोलिसांनी कदमवाडी येथे छापा टाकून दोघांवर कारवाई केली. या कारवाईत साडेनऊ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. नारायण शट्याप्पा कोरवी (वय २२, रा. कळंबा), आनंदा बाळासाहेब शेळके (रा. कदमवाडी) यांच्यावर गुन्हे नोंदवले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कदमवाडीत घरगुती सिलिंडरमधून वाहनांसाठी गॅस भरुन दिला जात असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छाप टाकला असता घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस इंधन वाहनामध्ये भरुन देण्यासाठी सिलिंडरला रेग्युलेटर पाईप जोडल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली. तर त्याच्याकडून अर्धवट गॅस भरलेली सिलिंडर टाकी, वजन काटा, रबरी पाईप आदी सुमारे साडेनऊ हजारांचे साहित्य जप्त केले.

Web Title: Kadamwadi raid while filling illegal gas in the vehicle