शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भाताच्या किमान वैधानिक दराची केवळ चर्चाच

By admin | Updated: December 17, 2014 23:10 IST

आजऱ्यातील स्थिती : शेतकऱ्यांच्या गरजेनुसारच ठरतात दर, पीक येण्यापूर्वीच पैशाची उचल

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -गेले महिनाभर भाताच्या दर्जानुसार भाताला दर मिळावेत, भाताला किमान दर न देणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याबाबत होणारी मागणी, कृषि उत्पन्न बाजार समित्या व व्यापाऱ्यांचे साटेलोटे असल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण होत असल्याचा केला जाणारा आरोप या सर्व मुद्यांनी भाताच्या दराचा प्रश्न ऐरणीवर आला असला तरी शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजेनुसार एप्रिल ते जून या कालावधीत येणाऱ्या भातपिकावर व्यापारी वर्गाकडून आगावू पैसे उचल होत असल्याने दराच्या मर्यादा स्पष्ट होत आहेत.सर्वसाधारणपणे पेरणीपूर्व मशागतीपर्यंत ग्रामीण भागातील छोटा शेतकरी वर्ग निश्चित असतो. एक-दोन वादळी पाऊस झाल्यानंतर पेरणीची धांदल उडते. बियाणे खरेदी, खते खरेदी, चिखलणी, लावण, कापणी, मळणी अशी ही खर्चाची मालिका सुरूच राहते. भरीस भर म्हणून यामधील कालावधीत येणारे सण-समारंभावरील खर्च शेतकरी वर्गाला आर्थिक अडचणीत आणणारे ठरतात. समोर पीक असल्याने बँकापेक्षाही दोन-चार महिन्यांसाठी भात व्यापारी जवळचे वाटतात आणि भातपीक हातात येण्यापूर्वीच भाताचे दर ठरून बऱ्यापैकी पैसेही उचल केले जातात.आजरा तालुक्यात हा प्रकार सर्रास शेतकरी व व्यापारी या दोघांकडूनही वापरला जातो. या व्यवहारात गरजेला पैसे मिळाल्याने दराचा विषय दुय्यम ठरतो. तर उत्पादीत भात आपणाला मिळणारा याची खात्री व्यापारी वर्गास झाल्याने सुगीनंतर संबंधित शेतकऱ्याकडून भात वसूल करणे एवढेच काम व्यापाऱ्याचे राहते.वर्षानुवर्षे ग्रामीण भागामध्ये हिच प्रथा चालत आली आहे. त्यामुळे किमान वैधानिक दर हा प्रकार सामान्य शेतकऱ्यांपासून कितीतरी दूर आहे. गरजेनुसार पैशाला प्राधान्य दिले जाते. भात उत्पादकांना बाजारपेठेतील भाताच्या दराच्या कल्पना असल्याने फारसे आर्थिक नुकसान होणार नाही याची असे व्यवहार होताना काळजी घेतली जाते.आजरा तालुक्यात सुमारे पावणेतीन लाख क्विंटल भात प्रतिवर्षी उत्पादित होते. यापैकी दोन लाख क्विंटल भात शेतकरी वर्ग स्वत:च्या वापरासाठी तर ७५ हजार क्विंटल विक्रीसाठी उपलब्ध होतो यापैकी सुमारे २५ ते ३० हजार क्विंटलची उलाढाल ही शेतकरी-व्यापारी संबंधातून होते. यात दराला दुय्यम स्थान रहाते.बाजार समितीचेही प्रयत्न फसलेयापूर्वी कृषि उत्पन्न बाजार समितीने भात खरेदीचा उपक्रम राबविला होता. परंतु हा उपक्रम भात खरेदी करणारे, भात विक्री करणारे व भाताचा दर ठरवणारेही व्यापारीच असल्याने यशस्वी होवू शकला नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत हा उपक्रम न पोहोचल्याने बाजार समितीला यामध्ये अपयश आले.दर्जेदार भाताची थेट बाजारात विक्रीभातावर व्यापाऱ्यांकडून आगाऊ स्वरूपात रकमांची उचल केली जात असली तरीही दफ्तरी, घनसाळ, काळा जिरगा, इद्रायणी, कोमल यासारख्या बाजारात वाढीव दर असणाऱ्या भातांची वाणे शेतकरी वर्ग थेट बाजारात विक्रीसाठी आणण्याकडेच शेतकऱ्यांचा कल दिसतो.