जिजाऊ जयंती, मुलींच्या नावे ठेवपावत्या वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:19 IST2021-01-14T04:19:59+5:302021-01-14T04:19:59+5:30

येथील तुळजाभवानी मंदिरात स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुलींचा जन्मदर वाढावा या सामाजिक ...

Jijau Jayanti, distribution of deposits in the name of girls | जिजाऊ जयंती, मुलींच्या नावे ठेवपावत्या वाटप

जिजाऊ जयंती, मुलींच्या नावे ठेवपावत्या वाटप

येथील तुळजाभवानी मंदिरात स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुलींचा जन्मदर वाढावा या सामाजिक हेतूने मुलीला जन्म दिलेल्या पालकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या घरात मुलगी जन्माला आली आहे, त्यांना जिजाऊ जन्मठेव योजनेच्या ठेवपावत्या फाउंडेशनने स्वखर्चाने करून दिल्या. फाउंडेशनने गेल्या दोन वर्षांत केलेल्या सर्व सामाजिक कार्याची माहिती सर्वांना कळावी या उद्देशाने यावर्षी दिनदर्शिका काढण्यात आली. या दिनदर्शिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश जाधव, उपाध्यक्ष शहाजी जाधव, सचिव संदीप जाधव, खजनिस शिवाजी जाधव व फाउंडेशनचे पदाधिकारी, तसेच जाधव परिवारातील ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Jijau Jayanti, distribution of deposits in the name of girls