शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूर, शिरोळला पावसाचा तडाखा

By admin | Updated: May 13, 2015 00:51 IST

वृक्ष, खांब कोसळले : विद्युत पुरवठा खंडित; सांगली-कोल्हापूर महामार्गावर वाहतूक विस्कळीत

जयसिंगपूर : जयसिंगपूरसह शिरोळ परिसरास मंगळवारी सायंकाळी वळीव पावसाने झोडपले. जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह सुमारे एक तास पडलेल्या पावसामुळे दोन ठिकाणी झाडे कोसळली, तर सात ठिकाणी विद्युत खांब पडले आहेत. त्यामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूकही काहीकाळ विस्कळीत झाली होती.सायंकाळी सहानंतर जोरदार वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली. पावसामुळे जयसिंगपुरातील प्रमुख रस्त्यावर वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडाली. शहरातील बसस्थानकातील आवाराला तळ्याचे स्वरूप आले होते. प्रवासी वर्गाची मोठी तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गावरील खडावकर हॉस्पिटलसमोरील तीन विद्युत खांब तसेच उदगाव-शिरोळ बायपास रस्त्यावरील तीन विद्युत खांब कोसळले. तसेच दहाव्या गल्लीत व नांदणी रोड, गोल्ड स्टार चौकात झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. झाडे उन्मळून पडल्यामुळे विद्युत खांब पडण्याच्या घटना घडल्या. यामुळे जयसिंगपूरसह शिरोळ, उदगावमधील विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. उदगाव व चिंचवाड परिसरातील वीटभट्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिरोळ, यड्राव परिसरातही जोरदार पाऊस झाला. शहरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे नाल्याचे स्वरूप आले होते. (प्रतिनिधी)