जयसिंगपूर संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:24 IST2021-03-08T04:24:32+5:302021-03-08T04:24:32+5:30

जयसिंगपूर : सध्या ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. तसेच बहुतांशी उसाला तुरे फुटल्याने ओल्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर ...

Jaisingpur Brief News | जयसिंगपूर संक्षिप्त बातम्या

जयसिंगपूर संक्षिप्त बातम्या

जयसिंगपूर : सध्या ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. तसेच बहुतांशी उसाला तुरे फुटल्याने ओल्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिरोळ तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय केला जातो. मात्र, सध्या ओल्या चाऱ्याची टंचाई भासत असल्याने पशुपालकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

------------------------

शिरोळमध्ये दुहेरी वाहतूक सुरूच

शिरोळ : येथील पद्माराजे विद्यालयासमोरील वन-वे मार्गावरून दुहेरी वाहतुक सुरूच आहे. या ठिकाणी पोलिसांकडून वन-वे मार्गाचा फलक लावण्यात आला असला तरी त्याचे पालन होताना दिसत नाही. वन-वे तोडून वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून याठिकाणी कारवाई होण्याची गरज आहे.

----------------------

आलास-जुगुळ रस्ता नादुरुस्त

बुबनाळ : आलास ते जुगुळ रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. कर्नाटकला जोडणारा मुख्य मार्ग असल्याने या मार्गावरून मोठी वाहतूक होत असते. तसेच सध्या ऊस गळिताचा हंगाम सुरू आहे. ट्रॅक्टर वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याअगोदर या मार्गावरील खड्डे बुजवून रस्ता डांबरीकरण करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Jaisingpur Brief News