शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

जुने बाहेर गेले ते बरं झालं, नव्यांना संधी मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST

(अरुण नरके यांचा फोटो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ च्या निवडणुकीत प्रत्येक वेळी तीन-चार संचालक बाहेर जातात. ...

(अरुण नरके यांचा फोटो वापरावा)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’ च्या निवडणुकीत प्रत्येक वेळी तीन-चार संचालक बाहेर जातात. यावेळेलाही तेच झाले; पण ते बाहेर गेले ते बरं झालं, त्यामुळे नव्यांना संधी मिळाली, असा टोला ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी लगावला. माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्याप्रमाणे आणखी काहीजण संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.

अरुण नरके म्हणाले, ‘गोकुळ’च्या राजकारणात राज्याचे मुख्यमंत्री लक्ष घालू लागले, मंत्री-खासदारांना तो हवाहवासा वाटू लागला. हा दूध संघ एवढा मोठा झाला, याचा मला अभिमान आहे. प्रत्येक निवडणुकीत तीन-चार जण नाराज होऊन बाजूला जातात. यावेळेलाही काहीजण गेले, मात्र बरे झालं, त्यामुळे नवीन लोकांना संधी देता आली. मुख्यमंत्री, खासदार, मंत्र्यांनी लक्ष घातले तरी कोणी संघ वाढविला, याची जाणीव दूध उत्पादकांना आहे.

कर्तबगार महिला म्हणूनच ‘शौमिकां’ना संधी

शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी आपल्या कामातून जिल्ह्यात छाप पाडली असून, त्या महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा म्हणून नव्हे, तर कर्तबगार महिला म्हणूनच त्यांना उमेदवारी दिल्याचे नरके यांनी सांगितले.

मग नरके कुटुंबातीलच चर्चा का

राज्याच्या राजकारणात अनेक घरांत एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. पाटील-पाटील उभे राहिले तर चालते; मग केवळ नरके कुटुंबातीलच चर्चा का? चेतन नरके यांच्यासारखा हुशार व या व्यवसायाचा अनुभव असलेला संचालक मिळाल्याने ‘गोकुळ’च्या प्रगतीत भरच पडेल, असे नरके यांनी सांगितले.

शेट्टी, आवाडे आम्हालाच पाठिंबा देतील

आमदार प्रकाश आवाडे हे नेहमी आमच्यासोबतच आहेत. राजू शेट्टी यांचा दूध संघ आहे. त्यामध्ये काय अडचणी आहेत, हे त्यांना माहिती आहे. ते ‘गोकुळ’च्या कामकाजाचे कौतुक करतात. त्यामुळे दोन्ही नेते आम्हालाच पाठिंबा देतील, असा विश्वास नरके यांनी व्यक्त केला.