शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नवीन लघू पाटबंधाऱ्यांना पाणी उपलब्ध परवाने द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST

मुंबईत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची घेतली भेट लोकमत न्यूज नेटवर्क वारणानगर : कृष्णा खोरेच्या लवादाप्रमाणे महाराष्ट्राच्या वाट्याला असलेले ...

मुंबईत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क

वारणानगर : कृष्णा खोरेच्या लवादाप्रमाणे महाराष्ट्राच्या वाट्याला असलेले वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी जुने आवश्यक नसणारे पाणी उपलब्धता परवाने रद्द करून नवीन लघू पाटबंधाऱ्यांना परवाने द्यावेत, अशी मागणी आमदार डॉ. विनय कोरे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मुंबई येथील झालेल्या बैठकीत केली. याबाबत सर्वेक्षण करून १५ दिवसांत अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

मुंबई येथे मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आमदार डॉ. विनय कोरे यांनी भेट घेऊन मतदारसंघातील शाहुवाडी तालुक्यातील पिशवी येथील जांभूळवाडा या १.७ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र असणाऱ्या लघुपाटबंधारे प्रकल्पात १.३९६ द्शलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. मात्र, पाणी उपलब्ध परवाना नसल्याने हा प्रकल्प प्रलंबित राहिला असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच कृष्णा खोरे लवादाप्रमाणे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील जुन्या लघुपाटबंधारेंना शासनाने पाणी उपलब्धता परवाने दिले आहेत. मात्र, आज त्या ठिकाणी काही मोठ्या योजनातून शेतीला पाणी मिळत आहे, तर काही वनखात्याच्या मंजुरीच्या अडचणीत सापडले आहेत. त्या लघुपाटबंधारे प्रकल्पांना पाणी उपलब्धता परवाने प्राप्त आहेत ते रद्द करून आवश्यक ठिकाणी लघुपाटबंधाऱ्यांना पाणी उपलब्धता परवाने दिल्यास शेकडो एकर शेती पाण्याखाली येणार असल्याची मागणी आमदार विनय कोरे यांनी केली.

याबाबत पंधरा दिवसांत सर्वेक्षण करण्याचे मंत्री पाटील यांनी जलसंपदा विभागाला आदेश दिले. त्याचा अहवाल आल्यानंतर तत्काळ नवीन लघू पाटबंधाऱ्यांना मंजुरी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

.

फोटो ओळी - मुंबईत झालेल्या शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातील लघू पाटबंधारे प्रकल्पासंदर्भातील बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी आमदार डॉ. विनय कोरे व शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी कृष्णा खोरे विकास मंडळाचे अधिकारी.