शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव गायरानमधील त्या ४४ प्लॉटधारकांचा विषय मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST

गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला पिंपळगाव (ता. भुदरगड) येथील गायरानमधील ४४ प्लॉटधारकांचा विषय न्यायालयीन प्रक्रियेने प्रलंबित झाला होता. ...

गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला पिंपळगाव (ता. भुदरगड) येथील गायरानमधील ४४ प्लॉटधारकांचा विषय न्यायालयीन प्रक्रियेने प्रलंबित झाला होता. या प्रकरणाचा निकाल या प्लॉटधारकांच्या बाजूने लागल्याने आमदार प्रकाश आबिटकर यांनी याविषयी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, लवकरच प्रांताधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

सन १९९० मध्ये पिंपळगाव येथील गावचे क्षेत्र कमी पडत असल्याने गावठाणवाढ करत गावातील गरीब व गरजू लोकांना राहण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत शासकीय योजनेमधून गावच्या गायरान जागेवर ग्रामपंचायतीने प्लॉट पाडून रीतसर ४४ जणांना प्लॉट मंजूर केले होते. त्यावेळी एका ग्रामस्थाने यावर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाचा निकाल काय लागेल या भीतीपोटी अनेकांनी प्लॉट मंजूर होऊनही येथे घरे बांधणे टाळले. यातील आठ लाभार्थिंनीच घरे बांधली. त्यांची घरे ग्रामपंचायतीकडून नावावर झाली, तर ३६ जणांनी घरे बांधलेली नाहीत. आता न्यायालयाचा निकाल या प्लॉटधारकांच्या बाजूने लागल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. हे मंजूर प्लॉट सातबारा पत्रकी नोंद होऊन कब्जापट्टी मिळावी, याबाबत गेल्या दोन वर्षांपासून प्लॉटधारकांकडून महसूल विभागाकडे रीतसर पाठपुरावा करण्यात येत आहे.

अनेक वर्षे रेंगाळत पडलेला हा विषय मार्गस्थ होणे गरजेचे आहे. याकामी लवकरच प्रांताधिकारी यांच्यासमवेत बैठक घेणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. यावेळी राजाराम सुतार, बाळासोा कळसकर, सुधाकर पलाने, तुकाराम सुतार, केरबा घुरे, पांडुरंग पाटील, ए. ए. शालबिद्रे, सिद्धार्थ कांबळे, बाळासोा पंडे, शिवाजी खतकर, शिवाजी कुंभार, धनाजी टेबुगडे, राजेंद्र मोरे आदी उपस्थित होते.